मुंबई

गरजू घटकांसाठी सहा पट तरतूद

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः महापालिका प्रशासनाने यंदा आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी गरजू समाजघटकांच्या कल्याणासाठी मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल सहापट अधिक तरतूद करून आपल्या अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असल्याचे दाखवून दिले आहे. नियोजन विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांसाठी भरीव तरतूद केली आहे.
आर्थिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये नियोजन खात्याच्या निरनिराळ्या योजनांसाठी ४० कोटी ३८ लाख रुपयांची तरतूद केली होती, ही तरतूद यंदा सुमारे सहा पटीने वाढवून आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी एकूण २५० कोटी रुपये करण्यात आली आहे. यामुळे नियोजन विभागाची वाटचाल आता एका नवीन पर्वाकडे होत आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (नियोजन) प्रशांत सपकाळे यांनी दिली.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जसे की, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्या सामाजिक कल्याणासाठी मुंबई महापालिका वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम करते. महिलांचा जीवनस्तर उंचावणे व त्यांचे सक्षमीकरण यासाठी महापालिका नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या मार्गांनी मदत करत असते. जेंडर बजेटअंतर्गत महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचावणे शक्य व्हावे, विकास कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग लाभावा, यासाठी निरनिराळ्या योजना राबवल्या जातात.
...
महिला बचत गटांना लाभ
महिला बचत गटांची संख्या वाढावी व एकत्रित सहभागातून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या दृष्टीने ११.६५ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. प्रतिमहिला बचतगट अनुदानाची रक्कम वाढवून ती ५० हजारपर्यंत करण्यात आली आहे. दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गतच्या बचत गटाला अतिरिक्त भांडवलाची रक्कम वाढवून रुपये ३५ हजार इतके करण्यात आले आहे. महिला बचत गटांना व्यवसायासाठी वरील व्याजावर अनुदान देण्यात येईल.
...
१०० कोटींचे अर्थसाह्य
महिलांसाठी अर्थसाह्य योजनेअंतर्गत १०० कोटी ९१ लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. शिवणयंत्र, घरघंटी, मसाला कांडप यंत्र व अगरबत्ती बनवण्याचे यंत्र इत्यादींचा त्यात समावेश आहे. तसेच निराधार आणि दुर्बल घटकातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली व महिला यांना परदेशी शिक्षणासाठी व्हिजा तसेच तत्सम परवान्यांकरिता अर्थसाह्यदेखील यामध्ये समाविष्ठ आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-बाईक व मालवाहक ई-रिक्षा खरेदीसाठी अर्थसाह्य, जिल्हास्तरीय खेळाडू एकरकमी प्रोत्साहन अशा योजनांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
...
दिव्यांग व्यक्तींसाठी...
दिव्यांग व्यक्तींसाठी अर्थसाह्य करतानाच या योजनेअंतर्गत २५ कोटी ३२ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. बेस्ट बसमधून मोफत प्रवास, स्कूटर खरेदीसाठी अर्थसाह्य, स्वयंरोजगारासाठी यंत्रसामग्री खरेदीकरिता अर्थसाह्य व ज्येष्ठ दिव्यांग व्यक्तींसाठी एकरकमी अर्थसाह्य देणे, अशा योजनांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.
...
घटकांनुसार तरतूद
तृतीयपंथींसाठी - २ कोटी
ज्येष्ठ नागरिकांसाठी - ११.३५ कोटी
महिलांसाठी प्रशिक्षण - ६.४४ कोटी
महिला बचत गटांचे आधार केंद्र ः ११.८८ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT