मुंबई

क्रॉस कनेक्शनमुळे उडाला गोंधळ

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : जुहू येथील इस्कॉन मंदिरात आज सकाळी एक निनावी दूरध्वनी आला. ‘सब तयार हैं ना, मैं १७ तारीख को आ रहा हु, युसूफ को मिल लिया? शक हो गया’, अशा संभाषणानंतर मंदिरातील सर्वेश कुमार यांची मात्र घबराट उडाली. दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. आठ तासांच्या चौकशीनंतर कॉल करणाऱ्या व्यक्तीला भोपाळला (मध्य प्रदेश) फोन लावायचा होता; मात्र तो चुकून (क्रॉस कनेक्शन) जुहू इस्कॉन मंदिरात लागल्याने पोलिसांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली.

मुंबई नेहमी दहशतवाद्यांच्या रडारवर असते. शिवाय शहरावर दहशतवादी हल्ल्याच्या धमक्यांचे निनावी फोन वारंवार येत असतात. त्यामुळे पोलिसांसह सामान्य नागरिकही सतर्कता बाळगतात. जुहूमधील इस्कॉन मंदिरात राहणारे सर्वेश कुमार यांना बुधवारी (ता. ८) सकाळी एकाने फोन केला. समोरील व्यक्तीचे संभाषण संशयास्पद वाटल्याने सर्वेश कुमार यांनी तात्काळ मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून याची माहिती दिली. पोलिसांनीही तात्काळ तपासाला सुरुवात केली. आठ तासांच्या चौकशीनंतर कथित दहशतवादी कारवाई संदर्भात कॉल हा ‘क्रॉस कनेक्शन’ असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांची धावपळ
सर्वेश कुमार यांना कॉल करणाऱ्या व्यक्तीला भोपाळ येथे संपर्क करायचा होता; मात्र तो चुकून जुहू इस्कॉन टेम्पलचे कुमार यांना लागला. चुकीचा कॉल लागल्याचे समजताच समोरच्या व्यक्तीने कॉल कट केला. मात्र या क्रॉस कनेक्शन आणि चुकीच्या अंदाजामुळे पोलिस यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT