मुंबई

ग्रामपंचायत सदस्य लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

CD

मनोर, ता. ८ (बातमीदार) : ना हरकत दाखल्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यासह एका खासगी इसमाला २५ हजारांची लाच घेताना पालघरच्या लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. ग्रामपंचायत सदस्य अजय शिनवार आणि विक्रांत चुरी याला बुधवारी (ता. ८) सायंकाळी अटक करण्यात आली. बोईसरलगतच्या मान ग्रामपंचायतीचा सदस्य अजय सुरेश शिनवार याने तक्रारदाराकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना काढण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या विरोधात तक्रारदाराने पालघर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. पडताळणीदरम्यान पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावर आज दुपारी दीडच्या सुमारास वारांगडे येथील अजय बिअर शॉप येथे सापळा रचला होता. २५ हजार रुपयांची लाच घेताना अजय शिनवार (वय २७) आणि विक्रांत चुरी (वय २९) याला ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT