मुंबई

महिला डॉक्टरची फसवणूक

CD

अंधेरी, ता. ९ (बातमीदार) ः मुलांची तपासणी करण्याच्‍या नावाने एका महिला डॉक्टरची फसवणूक झाल्याचा प्रकार सांताक्रूझ परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी चंद्रप्रकाश आणि सत्यप्रकाश या दोन तोतया अधिकाऱ्‍यांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ४७ वर्षांची तक्रारदार महिला ही डॉक्टर असून तिचे सांताक्रूझ येथे एक खासगी क्लिनिक आहे. दोन दिवसांपूर्वी तिला चंद्रप्रकाश नावाच्या एका व्यक्तीने फोन करून तो आर्मीमध्ये कामाला असल्याचे सांगितले. त्यांच्या क्लिनिकमध्ये आर्मीच्या ९७ मुलांचे चेकअप करायचे आहे. दररोज दहा मुलांना चेकअपसाठी पाठविले जाईल. त्यासाठी त्यांना त्यांचे सिनिअर अधिकारी कॉल करतील, असे सांगितले. त्यानंतर तिला सत्यप्रकाश नावाच्या व्यक्तीने फोन करून ९७ मुलांच्या चेकअपचे ऑनलाईन पेमेंटसाठी बँक खात्याची माहिती घेतली होती. तिचा विश्‍वास बसावा म्हणून त्याने तिला व्हिडीओ कॉलद्वारे तो आर्मी अधिकारी असल्याचे दाखवून दिले होते. तिच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यांनी तिच्या खात्यातून सुमारे दोन लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करून तिची फसवणूक केली होती. पैसे डेबिट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच तिला फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास आला होता. त्यानंतर तिने वाकोला पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सत्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश नाव सांगणाऱ्या आर्मीच्या दोन तोतया अधिकाऱ्‍यांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale: राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बरोबरच: मंत्री भरत गोगावले; माढा तालुक्यातील फळबागांची केली पाहणी!

Dilip Walse Patil: आंबेगाव तालुक्यातील ५ हजार ५८१ खाती कर्जमाफीसाठी पोर्टलवर अपलोड: दिलीप वळसे पाटील; उर्वरित खाती तातडीने अपलोड करा!

FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

रोहित शर्माने पूर्ण केलं संजू राठोडचं स्वप्न, 'हिटमॅन'सोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'लहानपणीचं स्वप्न...' Viral Video

Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

SCROLL FOR NEXT