मुंबई

वाडा कोलमची आठ एकर लागवड

CD

वाडा, ता. ९ (बातमीदार) : वाडा तालुक्यातील बहुद्देशीय शेती संस्थेच्या वाडा कोलम या वाणाला सन २१/२२ मध्ये राष्ट्रीय स्तरावर नामांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशभरात वाडा कोलमची विक्री केली जात आहे. यामुळे बहुद्देशीय शेती उत्पादन संस्थेच्या सभासदांनी या वर्षांत सहा एकर क्षेत्रात वाडा कोलम वाणाची उन्हाळी लागवड केली आहे.
बहुउद्देशीय शेती उत्पादन सहकारी संस्थेचे सभासद मोहन सावंत व विनायक सावंत या शेतकऱ्यांनी आंबिस्ते या गावी आपल्या सहा एकर क्षेत्र असलेल्या शेतीत वाडा कोलम व दोन एकरात सुरती कोलम या वाणांची उन्हाळी हंगामात लागवड केली आहे. वाडा कोलमला राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाल्यानंतर वाड्यातील शेतकऱ्यांकडून या वाणाची लागवड केली जात आहे. या वाणाला बाजारात चांगला भाव मिळतो. लहान, लांबट आकाराचा दाणा व सुवासिकपणा असल्याने वाडा कोलम व सुरती कोलमला भारतात व बाहेरील देशातून मागणी असते. उन्हाळी भात लागवडीबद्दल वाड्यातील कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या उन्हाळी भातशेतीला निवृत्त जिल्हाधिकारी भालचंद्र ठाकरे व वैभव पाटील यांनी भेट देऊन सावंत बंधूनी वाडा कोलम लागवडीबाबत तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT