मुंबई

महापालिकेचा अनधिकृत बांधकामावर हातोडा

CD

विरार, ता. ९ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या आदेशाने उपायुक्त अजित मुठे (अतिक्रमण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ‘जी’ वालीवअंतर्गत अनधिकृत बांधकामावर गुरुवारी हातोडा मारण्यात आला.
पालिकेच्या प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत चिंचोटी येथील सर्वे नं. ७५ व २८ येथे २५ खोल्यांचे एकूण ७५०० चौ. फुटाचे व ५२ प्लिंथ १५,६०० चौ. फुटाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. तसेच राजावली येथील भोयदापाडा रोड सर्वे नं. ३२ येथे २ रूम ६०० चौ. फूट व ३० प्लिंथ ९००० चौ. फुटाचे अनधिकृत बांधकामावरही कारवाई करण्यात आली. या कारवाई वेळी प्रभाग सहा. आयुक्त धनश्री शिंदे, कनिष्ठ अभियंता कल्पेश कडव, गौरव परिहार, लिपिक सुनील तेलगोटे, तसेच ससुनवघर तलाठी अधिकारी, प्रभाग समिती कर्मचारी, मजूर उपस्थित होते. या मोहिमेत एकूण ३२,७०० चौ. फुटाचे बांधकामी तोडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT