मुंबई

देहर्जे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

CD

विक्रमगड, ता. ९ (बातमीदार) : देहर्जे प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व जिजाऊ संघटना यांच्या माध्यमातून बुधवारपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. १४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांवर चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल अशा लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले; परंतु बाधितांच्या समस्यांचे योग्य रीतीने निरसन न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत आंदोलकांनी दिले.
प्रकल्पाचे काम जोराने सुरू असून संपादन व पुनर्वसन तसेच प्रकल्पबाधितांच्या समस्या यावर प्रशासन बोलण्यास किंवा चर्चा करण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप प्रकल्प बाधितांनी केला. याविरोधात पुकारलेल्या आंदोलनात प्रकल्पबाधित शेतकरी सर्व कुटुंबासहित मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी, प्रवेशबंदी आदेश काढून तसेच पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करून आंदोलकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु या सर्व गोष्टींना न जुमानता आंदोलकांनी आपल्या न्याय्य हक्कासाठीचे आंदोलन लेखी आश्वासन मिळेपर्यंत सुरू ठेवले. देहर्जे प्रकल्प पूर्ण रद्द करावा, ही प्रमुख मागणी; तर जमिनीचा मोबदल्यात जमीन, साठा प्रकल्प रद्द करून सिंचन प्रकल्प करावा, वनपट्टेधारकांना न्याय मिळावा, उजवा व डावा कालवा मंजूर करावा, संपादन व पुनर्वसन याबाबत सरकारने योग्य कार्यवाही करावी या मागण्यांवर आम्ही ठाम आहोत, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष संदेश ढोणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT