मुंबई

नौपड्यातील धोकादायक इमारतीला तडे

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : नौपड्यातील तळ अधिक ३ मजली असलेल्या वसंत को. ऑप. हाऊसिंग सोसायटी या इमारतीच्या भिंतीला व पिलरला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. ती इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असून त्यामध्ये सद्यस्थितीत कोणीही रहिवाशी राहत नाहीत; मात्र तळ मजल्यावर असणाऱ्या गाळ्यांमध्ये पिठाची गिरणी सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
गुरुवारी (ता. ९) सकाळी १० च्या सुमारास ४७ वर्षे जुनी असलेल्या या इमारतीच्या भिंतीला व पिलरला अनेक ठिकाणी तडे गेल्याची माहिती माजी नगरसेवक सुनेश जोशी यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. ही इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर प्रत्येकी दोन फ्लॅट असून तळाला एक गाळा आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी, नौपाडा-अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. धोकादायक इमारतीमध्ये सद्यस्थितीत कोणीही रहिवाशी राहत नसून, तळ मजल्यावर असणाऱ्या गाळ्यांमध्ये पिठाची गिरणी सुरू असून, त्यामध्ये राजू खरवार हा एक कर्मचारी काम करत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT