मुंबई

गोवर नियंत्रणात पण सावट कायम

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिकेने गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला वेग दिल्याने या आजारावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे; मात्र गुरुवारी दिवसभरात मुंबईमध्ये तब्बल १२ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने गोवरचे सावट कायम असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव वाढला. मुंबईत आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला असून ८ मृत्यू गोवरमुळे झाल्याचे पालिकेच्या डेथ कमिटीने अहवालात नमूद केले आहे. त्यात गुरुवारी दिवसभरात १२ नवीन गोवर बाधित रुग्णांची नोंद झाल्याने पालिकेच्या आरोग्य विभागासमोर या आजारावर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान कायम आहे. मुंबईत आज १२ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने गोवरबाधित रुग्णांची संख्या ८७ वर पोहोचली आहे.

शहरातील कुलाबा, भायखळा, वरळी, प्रभादेवी, अंधेरी पूर्व व पश्चिम, मालाड, कांदिवली गोरेगाव बोरिवली, चेंबूर, गोवंडी आदी भागात गोवरचा प्रादुर्भाव झाला आहे. मुंबईत ७८ भागात गोवरचा उद्रेक झाला असून ३७८ भागात गोवरचा फैलाव झाला आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात १८ संशयित रुग्णांची नोंद झाल्याने संशयितांची संख्या ४९२ वर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT