मुंबई

रिलायन्स विमा हप्त्यात सूट

CD

मुंबई, ता. ९ ः चांगल्या क्रेडिट स्कोर, नॉर्मल बीएमआय इंडेक्स, संपूर्ण लसीकरण आदी चांगल्या सवयी अंगी बाणवलेल्या नागरिकांना विमा पॉलिसीवर साडेसात टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय रिलायन्स जनरल इन्शुरन्सतर्फे घेण्यात आला आहे. लोकांना आर्थिक शिस्त लागावी व त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात हा यामागील उद्देश आहे. ज्या नागरिकांचा क्रेडिट स्कोर व क्रेडिट रेकॉर्ड चांगला आहे त्यांना विमा पॉलिसीच्या हप्त्यात साडेसात टक्के सवलत मिळेल.

नवीन विमा पॉलिसी खरेदी करणारे किंवा सध्याच्या रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीचे नूतनीकरण करणारे ग्राहक या निर्णयाचा फायदा घेऊ शकतील. ग्राहकांनी आर्थिक शिस्त लावून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचा हेतू यामागे आहे, असे रिलायन्स इन्शुरन्सतर्फे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे बॉडी मास इंडेक्स चांगला असलेल्या ग्राहकांनाही विमा हप्त्यांवर सवलत मिळेल. आपल्या पॉलिसीधारकांनी स्वतःचे आरोग्य चांगले ठेवावे, त्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरावेत यासाठी त्यांना सवलत देण्यात येत आहे. त्याचबरोबर कोविडचे दोन डोस किंवा बूस्टर डोस घेतलेल्या किंवा एचपी व्हॅक्सिन किंवा न्यूमोकोकल व्हॅक्सीन घेतलेल्या नागरिकांनाही विमा हप्त्यात सवलत मिळेल, असे रिलायन्स जनरल इन्शुरन्सतर्फे कळवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare Viral Photo Controversy : रुपाली चाकणकरांनंतर आता सुनील तटकरेंही गोत्यात? 'त्या' फोटोने वाढवलं टेन्शन! भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवणार?

अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, शेवटच्या व्हिडीओत मंत्र्याचं नाव घेतलं; मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रि‍पदाचा राजीनामा

Video: 6.6,6,6,6... KKR च्या युवा फलंदाजाने IPL पूर्वीच शतक करत दाखवली ताकद; प्रतिस्पर्ध्यांना रहावे लागेल अलर्ट

MSRTC: एसटीला दिलासा! दरवर्षी २४१ कोटींची बचत होणार, उत्पन्न वाढीसाठी परिवहनमंत्र्यांचा मोठा निर्णय

Pune समलैंगिक संबंधांना विरोध, २१ महिन्यात २ अल्पवयीनांची हत्या; २२ वर्षीय तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT