मुंबई

महामार्गावर बसच्या धडकेत ट्रक उलटला

CD

कासा, ता. ११ (बातमीदार) : शनिवारी पहाटे चारच्या दरम्यान एका ट्रकला मागून प्रवाशी बसने धडक दिल्याने ट्रक पुलावर उलटल्याची घटना मुंबई-अहमदबाद महामार्गावर घडली. धडकेनंतर ट्रक उलटल्याने ट्रक मधील सामान महामार्गावर पसरले होते, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर धानिवरी पुलावर एमएच- ०४, सीए- ९९८२ या कागदी गठ्ठे घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठी मागून भरधाव येणाऱ्या जीजे-०३, सीटी- ५३९५ प्रवाशी बसने जोरदार धडक दिली. ओव्हर टेक करताना बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. ही धडक एवढी जोरदार होती की, या धडकेने पुढील ट्रक धानिवरी पुलावर उलटला, व या ट्रकमधील कागदी गठ्ठे महामार्गावर सर्वत्र पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस व कासा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत अपघातग्रस्त वाहनांना बाजूस करण्याचे काम केले. त्यानंतर महामार्गावर पडलेल्या कागदाचे गठ्ठे पोलिसांनी मजुरांना बोलावून बाजूला करत वाहतूक कोंडी सोडवली. या अपघातात ट्रकचालकाच्या पायास गंभीर दुखापत झाल्याने त्याला धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT