मुंबई

शिक्षक परिषदेचे वार्षिक अधिवेशन

CD

मुंबई, ता. १२ (बातमीदार) : दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे वार्षिक अधिवेशन पार पडले. अधिवेशनाचे अध्यक्षस्थान नागपूर विभागाचे माजी आमदार नागो पुंडलिक गाणार यांनी भूषविले; तर याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, कोकण विभागाचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहित्यिक कविवर्य अशोक नायगावकर आणि अशोक बागवे उपस्थित होते. याप्रसंगी बारा गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच निबंध स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्‍या विद्यार्थ्यांचाही बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शिक्षक परिषदेची निर्मिती व इतिहास सांगितला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
हे ठराव झाले मान्‍य
शिक्षक परिषदेच्‍या अधिवेशनात २००५ नंतर नियुक्ती झालेल्या शिक्षकांसाठी जुनी पेंशन योजना लागू करणे, कॅशलेस मेडिक्लेम लागू करणे, १ तारखेला वेतन देण्याच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, रात्रशाळांचे प्रश्न मार्गी लावणे, तंत्र शिक्षकांचे प्रश्न, महिलांना बालसंगोपन रजा केंद्र सरकारप्रमाणे मंजूर करणे, ६ ते ८ वर्गांना शिकवणाऱ्‍या पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे, अश्वासित प्रगती योजना लागू करावी अशा प्रकारचे ११ ठराव मंजूर करण्यात आले. या ठरावांबाबत आजी-माजी शिक्षक आमदारांनी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : कोकणातील लोककलांना राजाश्रय मिळायला हवा; अनिकेत तटकरे

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT