मुंबई

दोन वर्षांच्या खंडानंतर बोर्डीत रंगणार चिकू फेस्टिव्हल

CD

बोर्डी, ता. १३ (बातमीदार) : कोरोना संक्रमणाच्या निर्बंधांमुळे दोन वर्ष डहाणूतील प्रसिद्ध चिकू महोत्सवात खंड पडला होता. पण कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने तसेच सामाजिक निर्बंध कमी केल्याने यंदा बोर्डीत मोठ्या दिमाखात चिकू महोत्सव पार पडणार आहे. यंदाचा चिकू महोत्सव १८ व १९ फेब्रुवारी असे दोन दिवस बोर्डी येथील समुद्रकिनारी आयोजित करण्यात येणार आहे.
स्थानिक पर्यटनाला चालना मिळावी, तसेच बोर्डी परिसरातील चिकू उत्पादकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पण कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे गेली दोन वर्षे या चिकू महोत्सवात खंड पडला होता. पण कोरोना नियंत्रणात आल्यानंतर निर्बंध मागे घेण्यात आल्याने यंदा या चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा हा महोत्सव बोर्डी येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या एस. आर. सावे कॅपींग गाऊंड येथे १८ व १९ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे.
रूरल एंटरप्रेनर वेल्फेअर फाउंडेशन, विविध स्थानिक संस्थांच्या सहकार्याने बोर्डी येथे ९ व्या चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ या थीमवर फेस्टिवलमधील सजावट केली जाणार आहे. यामध्ये स्थानिक उत्पादने, कलाविष्कार यांना ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर उपक्रमांवर प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच स्थानिय शेतकरी व बागातदारांसाठी कृषी प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या सोबतीने या महोत्सवात स्थानिक कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
या महोत्सवात आदिवासी चित्रकला, मातीची भांडी बनवणे, टोपल्या व नारळाच्या झावळ्या विणणे, हस्तकला, व्यंगचित्र बनवणे इत्यादी कार्यशाळांचा समावेश आहे. या महोत्सवात कलागुणांना वाव देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असून लहान मुलांसाठी पपेट शो, मेट्रो मॅजिक व इतर कार्यक्रमांचा समावेश आहे. या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटावा, असे आवाहन महोत्सवाच्या जनसंपर्क अधिकारी दीप्ती राऊत यांनी केले.
...
खवय्यांसाठी पर्वणी
दोन दिवसाच्या या महोत्सवामध्ये स्थानिक खाद्यसंस्कृतीला चालना देणारे स्टॉल मांडले जाणार आहेत. यात शाकाहारी आणि मांसाहारी असे विविध प्रकारचे खाद्य पदार्थ असणार असून ते खवय्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
...
‘चिकू पॅवेलियन’ कट्टा
विशेष म्हणजे या फेस्टिवलमध्ये चिकू फळ व त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व प्रदर्शनासाठी ‘चिकू पॅवेलियन’ असा विशेष कट्टा थाटण्यात येणार असून त्यामध्ये किमान १५ बागायतदार, चिकू पदार्थांचे उत्पादन करणारे गृह उद्योग व महिला उद्योगांना स्थान देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi speech Lok Sabha : होर्मुझमध्ये अडथळा कधीच...; लोकसभेत मोदींनी दिला स्पष्ट इशारा

Gold Smuggling Case : 'या' अभिनेत्रीचं 100 कोटींचं 'गोल्ड कनेक्शन'; युगांडा ते दुबईपर्यंत पसरलेलं तस्करीचं जाळं उघड, ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

Latest Marathi News Live Update : सलग पाचव्या दिवशी SIT कडून गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी सुरू

रेल्वेत टीसीच गैरवर्तन, प्रवाशाचं संतापून धक्कादायक कृत्य, मारहाण-धक्काबुक्की अन्...; Video Viral

Mars Research : मंगळ ग्रहावर सापडलं जीवसृष्टी बनवणारं केमिकल; नासाच्या रोव्हरने लावला शोध, पृथ्वीला कसा फायदा होणार? पाहा

SCROLL FOR NEXT