मुंबई

बीबीसीच्या दिल्ली, मुंबई कार्यालयात ‘आयकर’ची झाडाझडती

CD

मुंबई, ता. १४ : गुजरात दंगलीवर आधारित माहितीपटावरून ‘बीबीसी’विरोधात वाद पेटला असतानाच आज आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयाची झाडाझडती घेतली. आयकर विभागाच्या चारसदस्यीय पथकाने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील बीबीसीचे कार्यालय असलेल्या विंडसर इमारतीत हा छापा टाकला.

करसंबंधातील दस्तावेजांची तपासणी करण्यासाठी आयकर विभाग अधिकारी बीबीसीच्या कार्यालयात पोहोचले होते. या वेळी पथकाने कार्यालयातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कर्मचाऱ्यांचे मोबाईल तपासल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईसह नवी दिल्ली येथील बीबीसी कार्यालयातही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. दरम्यान, आम्ही आयकर अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे. आम्हाला आशा आहे, की ही समस्या लवकरात लवकर सोडवली जाईल, असे बीबीसीच्या प्रवक्त्याने प्रतिक्रियेत म्हटले आहे.

हे तर सर्वेक्षण?
आयकर विभागाने बीबीसी कार्यालयात केलेली कारवाई हे ‘सर्वेक्षण’ असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात ते मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये झालेल्या दंगलीवरून वादग्रस्त माहितीपट बीबीसीने काही दिवसांपूर्वी प्रसारित केला होता. केंद्र सरकारने दोन भागांच्या या माहितीपटाला बदनामी करण्यासाठी केलेला प्रचाराचा भाग म्हणून सांगत भारतात बंदी घातली होती. या बंदीच्या काही आठवड्यांनंतरच आज बीबीसी कार्यालयात कारवाई झाल्याने देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT