vegetables rate  esakal
मुंबई

Vegetables Rate : हवामान बदलाचा भाज्यांना फटका

बाजारात गवार प्रतिकिलो ७० रुपयांवर पोहोचली असून टोमॅटो ४० रुपयांवरून २० रुपयांवर

सकाळ वृत्तसेवा

वाशी : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक सध्यातरी स्थिर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढू लागल्याने भाज्यांचे दरही आतापासून वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारात गवार प्रतिकिलो ७० रुपयांवर पोहोचली असून टोमॅटो ४० रुपयांवरून २० रुपयांवर आले आहेत.

तुर्भे येथील एपीएमसी बाजारात ६६५ भाजीपाल्यांच्या गाड्यांची आवक झाली आहे; तर फळ बाजारात कलिंगड, काळी व हिरवी द्राक्षे, परराज्यांतील सफरचंदांची दैनंदिन आवक वाढली आहे. अशातच फेब्रुवारी महिन्यातच मे महिन्यासारखा पारा चढला असल्याने रात्री वाढणारी उष्णता आणि सकाळी हवेत असणारा गारवा याचा फटका भाज्यांना बसत असल्याने भाव वाढल्याची माहिती घाऊक भाजी विक्रेत्यांनी दिली आहे.

एपीएमसीच्या घाऊक बाजारात मेथी- १६ रुपये, कांदापात- १५ रुपये, शेपू- २० रुपये, शिमला मिरची- २५ रुपये, मटार- २५ रुपये, भेंडी- ४५ रुपये, गवार- ७० रुपये, कोबी- १० रुपये, फ्लॉवर- १२ रुपये, टोमॅटो- १८ ते २० रुपये, कोथिंबीर २० रुपये जुडीने विकली जात आहे.

लिंबू ३०० रुपये शेकडा
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हिवाळ्याच्या शेवटपर्यंत थंडीऐवजी उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी लिंबू-पाणी, रसाळ फळे, ज्यूसची मागणी वाढू लागली आहे. शहरातील अनेक रस्त्यावर लिंबू-पाणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. एपीएमसीत ३०० रुपये शेकड्याने लिंबू विकला जात असून १० रुपये ग्लास असणारे लिंबू-पाणी १२ ते १५ रुपयांनी विकले जाते.

येत्या महिनाभर हवामान बदलाची स्थिती अशीच राहिल्यानंतर उन्हाळ्यापूर्वीच भाज्यांच्या दरांमध्ये देखील अशाच प्रकारे चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच मार्च ते मे महिन्यात भाजीपाल्यांचे कमी उत्पादन घेतले जात असल्याने भाव वाढणार आहेत.
- अशोक शेळके, व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT