मुंबई

महाशिवरात्रीपूर्वीच फराळाला महागाईची झळ

CD

वाशी, ता. १६ (बातमीदार)ः धार्मिक महत्त्व असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक उपवास करतात. या पार्श्वभूमीवर फराळाच्या पदार्थांना मागणी वाढणार असल्यामुळे दरांमध्ये तेजी बघायला मिळत आहे. आवक मर्यादित असताना शेंगदाण्यालाही वाढती मागणी लक्षात घेता प्रतिकिलो दर दीडशेपार गेला आहे; तर साबुदाण्यानेही प्रतिकिलो पंचाहत्तरी गाठली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त शहरी भागात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. यानिमित्ताने फराळाच्या पदार्थांचे वाटप केले जाते, तर घराघरात उपवास केला जात असल्याने किरकोळ बाजारात साबुदाणा, शेंगदाणा, राजगिरा, खजूर आणि फळांच्या मागणीमध्ये वाढ होते. रोजच्या स्वयंपाकासह उपवासात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा शेंगदाणा गेल्या काही दिवसांपासून तेजीत आहे. महिन्याभरात शेंगदाणा दरात किलोमागे १५ ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. ११० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणारा शेंगदाणा सध्या १३० ते १४० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. नवीन आवक दाखल होईपर्यंत दरांत तेजी कायम राहणार, असा अंदाज व्‍यावसायिकांनी वर्तवला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ बाजारात ६० ते ६५ रुपये प्रतिकिलोने विक्री होणारा साबुदाणा सध्या ७२ ते ७५ रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. येत्या काही दिवसात दरांत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
--------------------------------
खजूर, राजगिरा लाडूला मागणी
फराळाच्या पदार्थांप्रमाणेच खजूर, राजगिराचे तयार लाडू व अन्य पदार्थांच्या मागणीत वाढ नोंदवली जात आहे. सध्या बाजारपेठेत १२० रुपये किलोपासून खजूरविक्रीसाठी उपलब्ध असून, गुणवत्तेनुसार ३०० रुपये प्रतिकिलोपर्यंतचे खजूर बाजारपेठेत उपलब्ध आहेत. राजगिराच्या तीन, सहा, बारा लाडूचे पॅकेट बाजारपेठेत उपलब्ध असून १० रुपयांपासून; तर ४० रुपये दराने विक्री होत आहे.
---------------------------------
फळांनी सजली बाजारपेठ
सध्या बाजारपेठेत द्राक्षांसह विविध हंगामी फळे दाखल झाली आहेत. यात प्रामुख्याने पेरू, चिकू, पपई, सफरचंद या फळांना मागणी वाढलेली आहे. सफरचंदाची आवक मर्यादित असल्याने दर १२० रुपये किलोपासून पुढे आहेत. पेरूचे दर ६० ते ८० रुपये किलो, पपईचे दर ४० रुपये किलोपासून पुढे आहेत. याशिवाय स्ट्रॉबेरी, मोसंबी, संत्रीची जोरदार खरेदी सध्या ग्राहकांकडून केली जाते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT