मुंबई

यिन जिल्हाध्यक्षपदी शुभम सैद, कार्याध्यक्षपदी प्रथम गुप्ता

CD

ठाणे, ता. १८ : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यात येतो. या उपक्रमानुसार ठाणे जिल्ह्यातील महाविद्यालयात मतदानाद्वारे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर ठाणे जिल्ह्यातून नेतृत्व करण्यासाठीची निवड प्रक्रिया शुक्रवारी (ता. १७) पार पडली. यात यिनच्या जिल्हाध्यक्षपदी बी. के. बिर्ला कॉलेजचा शुभम सैद आणि कार्याध्यक्षपदी एन. एल. दालमिया कॉलेजचा प्रथम गुप्ता यांची निवड झाली. या दोघांनाही राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. तसेच महापौरपदी बी. के. बिर्ला कॉलेजचा आकाश दुधकर आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदी एन. एल. दालमिया कॉलेजची साक्षी सिंह यांची निवड झाली.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांना राज्यस्तरावर यिन शॅडो मंत्रिमंडळात मंत्रिपदाची सुवर्णसंधी मिळणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी ६० गुणांची लेखी परीक्षा व ४० गुणांची व्यक्तिमत्त्व व कौशल्य चाचणी मुलाखतीद्वारे घेण्यात आली. यात उमेदवारांचे गुणांकन करून टॉप फाईव्ह उमेदवार निश्चित करण्यात आले. यातून अंतिम दोन उमेदवार निवडून त्यांना इतर महाविद्यालय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी केलेल्या मतदानाद्वारे अंतिम निवडी जाहीर करण्यात आल्या.

काय म्हणतात परीक्षक
यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या माध्यमातून आपल्यातील नेतृत्वगुण आणि सर्वांगीण विकास करता येईल, अशी भावना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये आहे. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यिनसारख्या व्यासपीठात जोडले जावेत, अशी आशा करतो.
- प्रा. डॉ. रामकिशन भिसे
...
‘सकाळ’ माध्यम समूहाचे यिन म्हणजे नवीन तरुण पिढीला राजकारणात आणि समाजकारणात येण्याआधीची पहिली पायरी आहे. यिनसाठी जिल्हा व राज्यस्तरीय नेतृत्वासाठी अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. या निवडप्रक्रियेसाठी मला परीक्षक म्हणून बोलावले होते. त्यामध्ये युवकांची जिद्द दिसून आली.
- समाधान काशीद, ॲडव्होकेट
...
‘सकाळ’च्या माध्यमातून यिन उपक्रमाद्वारे तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जे उपक्रम घेतले जातात, ते उत्तमच असतात. यिनच्या पुढील वाटचालीसाठी तसेच निवडून आलेल्या नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्ष यांनादेखील खूप खूप शुभेच्छा!
- पांडुरंग देवरे, उद्योजक

यिनचे जिल्हास्तरीय पदाधिकारी
जिल्हाध्यक्ष : शुभम सैद
कार्याध्यक्ष : प्रथम गुप्ता
उपाध्यक्ष : श्रेया कोळवणकर
सरचिटणीस : साक्षी दिवाण
प्रवक्ता : आदित्य चन्ने
महापौर : आकाश दुधकर
जिल्हा परिषद अध्यक्ष : साक्षी सिंह
सभापती : संकेत बांद्रे
उपसभापती : सिद्धेश तेलंगे
गटनेता : अंजली ठाकूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT