मुंबई

उल्हासनगरातील महाशिवरात्री ध्वनी प्रदूषणमुक्त

CD

उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : महानगरपालिका, पोलिस आणि हिराली फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने पिपाण्या आणि भोंगे जप्त करण्याची मोहीम राबवण्यात आल्याने उल्हासनगरातील महाशिवरात्री ध्वनी प्रदूषणमुक्त करण्यास यश मिळाले.
महाशिवरात्रीनिमित्ताने सर्वात मोठी यात्रा ही अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरात भरत असते. या यात्रेत भोंगा किंवा पिपाणी विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने कर्कश आवाजाने अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. २०१७ साली हिराली फाऊंडेशनने पोलिस आणि महापालिकेच्या मदतीने पिपाणी आणि भोंगामुक्त महाशिवरात्री उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेंव्हापासून भोंगा आणि पिपाणी जप्त करण्याची मोहीम राबवली जात आहे. याबाबत यंदा महापालिका प्रशासनाने शहरात बॅनरबाजी करून सर्वांना ध्वनी प्रदूषण रोखण्याचे आवाहन केले होते.
पर्यावरणवादी सरिता खानचंदानी यांच्या हिराली फाऊंडेशनच्या वतीने या मोहिमेत सहभागी झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, महापालिका अधिकारी विनोद केणी, विशाखा सावंत, एकनाथ पवार, सफाई कामगार रंजना राजगुरू यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT