मुंबई

किसन कथोरेंच्या निषेधार्थ चारोटीत मोर्चा

CD

कासा, ता. २० (बातमीदार) : आमदार किसन कथोरे यांनी आदिवासी जनसमुदायाचे रोजगार व आरक्षण काढून टाकण्यासंबंधी केलेल्या मागणीच्या निषेधार्थ सोमवारी चारोटी टोल नाका येथे आंदोलन करण्यात आले. यात भूमी सेना व आदिवासी एकता परिषदेतर्फे निषेध करून टोल नाका काही काळ बंद करून आमदार किसन कथोरे व शासनाचा निषेध करण्यात आला.
कथोरे यांनी अनुसूचित क्षेत्रातील १७ पदांच्या नोकर भरतीत अनुसूचित जाती व इतर मागासवर्ग, तसेच खुल्या वर्गातील उमेदवारांना संधी मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे केल्याने मूळ निवासी आदिवासी समाजावर अन्याय होणार आहे. या निषेधार्थ चारोटी टोल नाका येथे भूमी सेना व आदिवासी एकता परिषदेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. सोमवारी सकाळी चारोटी नाक्यावरून चालत घोषणा देत हा मोर्चा टोल नाक्यावर आला. तेथे सर्व कार्यकर्त्यांनी काही काळ सर्व लेन रोखून धरल्या. यावेळी आदिवासी एकता परिषदेचे कार्याध्यक्ष श्यामसुंदर चौधरी म्हणाले की, येथील जंगल, जमीन, पाणी यांच्यावर आमचा हक्क आहे. त्याचबरोबर विविध नोकर भरतीत आमचे आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे. यासाठी आदिवासी समाज आवाज उठवत आहे.
यावेळी भूमी सेनेचे कार्यकर्ते भरत वायडा यांनी या सरकारचा निषेध करताना आमच्या हक्काच्या जागा हिरावून घेण्याच्या या सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत. डहाणू परिसरात विनाशकारी प्रकल्पांमुळे आदिवासी जनसमुदाय याला बेदखल केले जात आहे, असे सांगितले. या निषेध मोर्चामध्ये कासा, चारोटी, वेती, वरोती, वाणगाव परिसरातून आदिवासी कार्यकर्ते सहभागी झाले होते. कासा पोलिस ठाणे अधिकारी श्रीकांत शिंदे यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. त्याचबरोबर महामार्ग पोलिस सहनिरीक्षक एस. सय्यद व टोल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

SCROLL FOR NEXT