मुंबई

बेकायदा फेरीवाल्यांचा ठिय्या

CD

घणसोली, ता.२१ (बातमीदार)ः कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेर बेघरांबरोबर आता फेरीवाल्यांनीही बस्तान बसवले आहे. रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या मार्गात अडथळे निर्माण झाले असून स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील या बेकायदा व्यवसायांकडे पोलिस तसेच पालिकेने दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
दाट लोकवस्ती असलेल्या कोपरखैरणे रेल्वे स्थानकातून दररोज हजारो संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या स्थानकांच्या परिसराला अतिशय गलिच्छ स्वरूप आले आहे. स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात बेघर नागरिकांचे वास्तव्य असते. त्यामुळे तिथेच राहणे, खाणे अशा प्रकारांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अशातच आता रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांनी देखील उच्छाद मांडला असून स्थानकाच्या प्रवेशद्वारावर भाज्या, फळे, बॅग्ज, बेल्ट्स, चपला, खेळणी तसेच भाजी-विक्रेत्यांनी ठाण मांडले असल्याने धावपळीच्या वेळेत अडथळ्यांची शर्यत पार करत प्रवास करण्याची वेळ आली आहे.
-------------------------------------------------
न्यायालयाच्या आदेशांचा यंत्रणांना विसर
रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसाठी रेल्वेने विभागाने प्रत्येक रेल्वे स्थानकावर पोलिस तैनात केले आहे. असे असताना देखील घणसोली रेल्वे स्थानकावर फेरीवाल्यांनी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर कब्जा करून व्यवसाय थाटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परीक्षेत्रात फेरीवाल्यांना मज्जाव करण्यात आला आहे. असे असताना देखील रेल्वे पोलिसांकडून फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
---------------------------------
घणसोली रेल्वे स्टेशन बाहेर फेरीवाले बेकायदा व्यवसाय करतात. तसेच या परिसरात ये-जा करण्यासाठी प्रवाशांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याने यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा परिसरावर पूर्णपणे अतिक्रमण केले जाईल.
- योगेश शिंदे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Grain Export: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! गहू-साखर निर्यातीला सरकारकडून मंजुरी; कृषी निर्यातीत नवा अध्याय

Farmer Death : विदर्भात २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; आर्थिक विवंचनेतून उचललं टोकाचं पाऊल

Pune News : महापालिकेच्या कार्यालयात तरुणाची पिस्तूलसह आत्महत्येची धमकी; कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Crime News : पुण्यातील स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांनी व्यवस्थापकाला घेतले ताब्यात

India vs Pakistan T20 World Cup : पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अभिषेक शर्मा सलामीला येणार? प्रकृतीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर...

SCROLL FOR NEXT