मुंबई

सकल मातंग समाजाचा आज आझाद मैदानात मोर्चा

CD

मुंबादेवी, ता. २१ (बातमीदार) ः सकल मातंग समाजाच्या वतीने विविध संघटना एकत्र येऊन बुधवारी (ता. २२) आझाद मैदान येथे महामोर्चा काढीत धडक देणार असल्याची माहिती ॲड. राम चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांच्यासोबत अशोक ससाने, शंकर कांबळे, अशोकराव आल्हाट उपस्थित होते.
चव्हाण यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गात ५९ जाती असून या प्रवर्गासाठी असलेल्या नोकरी व शिक्षणाचा आरक्षणाचा लाभ निवडक एक दोन जातींनाच मिळत आहे. संविधान अनुच्छेदाप्रमाणे राज्य शासनाने आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवून एक प्रकारे संविधानाचा अपमान केला असल्‍याचा त्‍यांनी आरोप केला. नोकरी, शिक्षण यामध्‍ये १३ टक्के आरक्षण हे अ, ब, क, ड असे वर्गीकरण केल्यानंतरच प्राप्त होईल. मातंग समाज हा विविध लाभांपासून वंचित राहिलेला आहे. आमच्या हक्काच्या प्राप्तीसाठी आम्ही महाआंदोलन करणार आहोत, असे ॲड. राम चव्हाण यांनी म्हटले.

आर्टी स्‍थापनेची मागणी
अनुसूचित जातीच्या आरक्षण गटामध्ये अ, ब, क, ड वर्गीकरण करणे गरजेचे आहे. बार्टीच्या धर्तीवर आर्टी म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापना व्हावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील मातंग समाज आझाद मैदानात धरणे आंदोलन करील, असे अशोक आल्हाट यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

Free Registration of 50 Lakh Rural Properties: पंतप्रधानांच्या वाढदिवशी 'स्वामित्व योजने'ने गावकऱ्यांना दिला मालकी हक्क! ५० लाख ग्रामीण संपत्तींची मोफत रजिस्ट्री

SCROLL FOR NEXT