मुंबई

विक्रमगड विधानसभा क्षेत्रात आता शववाहिका

CD

मोखाडा, ता. २३ (बातमीदार) : गतसाली जव्हार उपजिल्हा रुग्णालयात मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथील आदिवासी बालकांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शव घरी नेण्यासाठी दवाखाना प्रशासनाने ॲम्बुलन्स नाकारली होती. अखेर त्याच्या पालकांनी दुचाकीवर आपल्या चिमुकल्याचे शव रात्रीच्या वेळेस घरी नेण्याची वेळ आली होती. यासारख्या अनेक घटना मोखाडा परिसरात घडल्या आहेत. जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या विक्रमगड विधानसभा क्षेत्रात एकही शववाहिका नाही. वर्षानुवर्षाची ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी आमदार सुनील भुसारांनी पुढाकार घेतला आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधून भुसारा यांनी मृत्यूनंतर मृतदेहाचे हाल होऊ नये म्हणून, शववाहिका उपलब्ध करून तीचे लोकार्पण केले आहे.
मोखाड्यातील पायरवाडी येथील बालकाच्या मृतदेहाच्या हेळसांड झाल्याची घटना घडल्यानंतर आमदार सुनील भुसारा यांनी या घटनेची दखल घेऊन लवकरच शववाहिनी उपलब्ध करून देण्याचे आश्वासने दिले होते. दिलेला शब्द आमदार भुसारा यांनी पाळला असुन महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोखाड्यात शववाहिनी वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला. आजही जव्हार व मोखाडा सारख्या ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झालेल्या व्यक्तीचा रुग्णालयात अचानक मृत्यू झाल्यानंतर किंवा शवविच्छेदनासाठी शव आणल्यानंतर त्या कुटुंबाला आपल्या मयत व्यक्तीचे प्रेत नेण्यासाठी शववाहिका नसल्याने असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता.

-------------
चालकांचा नंबर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात देणार
गरीब आदिवासींसह मध्यमवर्गीयांना पदरमोड करून खाजगी वाहन करुन शव घरी घेऊन जावे लागत असे. अशा दुःखाच्या प्रसंगी गोरगरीब कुटुंबाकडे वाहनांचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने, अनेकदा त्यांना मृतदेह डोली करून घरी न्यावा लागत आहे. त्यामुळे असे प्रसंग पुन्हापुन्हा घडू नयेत यासाठी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी आपले वडील चंद्रकात भुसारा (गुरुजी) यांच्या स्मरणार्थ गोर गरीबांच्या सेवेसाठी शववाहिका वाहन उपलब्ध करून दिली आहे. या शववाहिका चालकांचा संपर्क नंबर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात देण्यात येणार असून, आता मृतदेहाची शववाहिकेअभावीची फरफट थांबणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT