मुंबई

घरफोडी करणाऱ्याला अटक

CD

मानखुर्द, ता. २३ (बातमीदार) ः घरफोडी करून पळालेल्या अशरफ बेग ऊर्फ मेंढा याला कुर्ला पोलिसांनी रविवारी (ता. १९) अटक केली. त्याने कुर्ल्याच्या तकियावाड परिसरात घरफोडी करून दागिन्यांची चोरी केली होती. त्याला धारावीच्या एकेजी नगर येथील मैदानाजवळून ताब्यात घेऊन चोरलेले दागिने पोलिसांनी जप्त केले. काही दिवसांपूर्वी कुर्ल्याच्या तकियावाड येथील मासुमबाई चाळीतील रहिवासी आझाद शेख यांच्या घरात चोरी झाली होती. ते घरात नसताना चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील दागिने चोरून पळ काढला. दुसऱ्या दिवशी आझाद यांनी कुर्ला पोलिस ठाणे गाठत अज्ञात चोराविरोधात तक्रार केली. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र होवाळे यांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत सहायक निरीक्षक नंदूलाल पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकावर या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी सोपवली. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना, अशरफ या सराईत गुन्हेगाराने ती घरफोडी केल्याची पथकाला मिळाली. तो धारावीच्या एकेजी नगर परिसरात असल्याची माहिती खबऱ्यांनी पथकाला दिली. त्या माहितीच्या आधारे पथकाने त्याला सापळा लावून त्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्याला पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून चोरलेले दागिने पोलिसांनी जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT