मुंबई

विविध मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

CD

भांडुप, ता. २२ (बातमीदार) ः संपूर्ण महाराष्‍ट्रात अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. अंगणवाडी कर्मचारी संघटनांमार्फत कांजूरमार्ग येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्य पातळीवरील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सेविकांना देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याचाही आरोप या वेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षांत मानधनामध्ये वाढ केलेली नाही; ती करण्यात यावी, पटसंख्या कमी असल्याच्या नावाखाली अंगणवाड्या बंद करण्याचा शासनाचा विचार मागे घ्यायला लावणे, पोषण ट्रॅकर अॅप मराठीत देणे, मदतनीस, सेविका व मुख्य सेविकांच्या रिक्त जागा भरणे, पदोन्नतीला प्राधान्य देणे, दिवाळीला तुटपुंजी भाऊबीज न देता एका महिन्याच्या मानधनाइतका बोनस देण्यात यावा आदी मागण्या त्‍यांनी केल्‍या आहेत. या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी अनेक वेळा आंदोलने केली; मात्र सरकारने महत्त्वाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर परिसरातून मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस जमल्याचे पाहायला मिळाले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका या शासकीय सेवेपासून वंचित आहेत. शासनाकडे अनेकदा निवेदने दिली. आंदोलने केली, तरीही शासनाला जाग येत नाही. शासनाला जाग यावी म्हणून आम्ही आंदोलन करीत आहोत.
- स्नेहा सावंत, अंगणवाडी सेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

शेतकरी दुष्काळाने होरपळतोय, नेते खातायत सुकामेवा, आढावा बैठकीत काजू बदामचा नाश्ता

IIT Bombay ChatGPT Incident : IIT बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अधिकृत खुलासा; शिस्तभंगाची कारवाई केली होती का? संस्थेने सांगितलं सत्य

प्रसूतीनंतर ५० दिवस मृत्यूशी झुंज, स्तनदा मातेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; उपचारानंतर मिळालं जीवनदान!

SCROLL FOR NEXT