मुंबई

मराठी मनोरंजनविश्वासाठी लवकरच फिल्मबाजार पोर्टल!

CD

मुंबई, ता. २२ : राज्यात मराठी चित्रपट, मालिका, ओटीटी याशिवाय विविध कार्यक्रमांसाठी फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी सरकारकडून समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्षांसह स्वप्नील जोशी, संदीप घुगे, केतन मारू, संजय जाधव, महेश कोठारे यांचा समावेश असणार आहे. मराठी चित्रपट, विविध वाहिन्यांवरील मराठी मालिका, कार्यक्रम तसेच ओटीटीवरील मराठी चित्रपट-वेबसीरिजच्या निर्मितीसाठी पटकथा, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ तसेच वित्त पुरवठादारांना एका व्यासपीठावर आणणे, त्यांच्यात समन्वय साधणे, आदींसाठी ही समिती काम करेल. त्याशिवाय राज्यातील स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपट, मालिका, वेबसीरिज निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच शासनाला अशा प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य आणि सल्ला देण्याचे कामही नियुक्त समिती करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT