मुंबई

पदपथावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

CD

भांडुप, ता. २३ (बातमीदार) ः भांडुप पश्चिम एल. बी. एस. मार्ग परिसरात जागोजागी मेट्रोची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्‍यातच पदपथांवर अनधिकृत फेरीवाल्‍यांनी अतिक्रमण केल्‍यामुळे नागरिकांना चालणेही मुश्किल झाले आहे. या समस्यांबाबत ‘सकाळ’ने ‘अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण’ या शीर्षकाखाली बुधवारी (ता. २२) वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पालिकेने बातमीची दखल घेत लगेचच पदपथांवरील फेरीवाल्‍यांवर कारवाई केली आहे. या ठिकाणाहून अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या लोखंडी पेट्या, डंबेल्स, लोखंडाचे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य ताब्यात घेतले आहे.
भांडुप पश्चिमेला असलेल्या ड्रीम्स मॉल गेटच्या समोरील पदपथावर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. या ठिकाणी लोखंडाच्या वस्तू विकल्‍या जात होत्‍या. विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू ठेवण्यासाठी याच ठिकाणी मोठ्या लोखंडी पेट्या ठेवल्या असल्याचे दिसत होते. परिणामी प्रवाशांना ये–जा करण्यास गैरसोयीचे झाले होते. ‘सकाळ’च्‍या वृत्तानंतर पालिकेने पदपथ मोकळा केला आहे. यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT