मुंबई

मिनीबसची एसटीला जोरदार धडक

CD

माणगाव, ता.२३(बातमीदार)ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावपासून ४ किमी अंतरावर असणाऱ्या मुगवली गावच्या हद्दीत बुधवारी (ता.२२) मध्यरात्री साधारण१.१५ च्या सुमारास मिनीबसने एसटीला धडक दिली आहे. या अपघातात देवगड-नालासोपारा एसटी बसमधील ७ प्रवासी जखमी आहेत.
पुण्याहून महाडकडे निघालेली मिनी बस क्रमांक एम.एच.१४-सीडब्लू ५५०८ या गाडीवरील चालक दिनेश घबाड (वय ३२) रा. काळेवाडी पिंपरी चिंचवड जि. पुणे यांनी विरुद्ध दिशेला जाताना समोरून येणाऱ्या देवगड-नालासोपारा एसटीला धडक दिली. या अपघातात एसटी बसमधील विनायक साटम (वय-६०) रा. देवगड जि. सिंधुदुर्ग, माया गोसावी (वय ३२) रा.कुडाळ जि. सिंधुदुर्ग, शुभांगी तावडे (वय-६९), रमेश तावडे (वय-७३) दोन्ही रा. राजापूर , उज्वला चौगुले (वय-५५), उदय चौगुले (वय- ५१) दोन्ही रा. सिंधुदुर्ग, दिनेश कदम (वय- ३९) रा. साईनगर माणगाव सध्या रा.विरार जि. ठाणे हे सात प्रवासी जखमी झाले आहेत.

.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT