मुंबई

मराठी भाषादिनानिमित्ताने कवी संमेलन

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या मराठी भाषा गौरवदिनी ठाणे महानगरपालिकेतर्फे निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी (ता. २७) सायंकाळी ६ वाजल्यापासून ठाणेकर रसिकांना राज्याच्या विविध भागांतील कवींच्या काव्य सादरीकरणाचा आस्वाद घेता येणार आहे. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. निमंत्रितांच्या कवी संमेलनात प्रा. डॉ. प्रज्ञा पवार, ठाण्याचे सहायक पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, महेश केळुसकर, अशोक बागवे, विजय चोरमारे, संजीवनी तडेगावकर, आप्पा ठाकूर, अनंत राऊत, अशोक कोतवाल, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आदी मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. महेश केळुसकर आणि विजय चोरमारे या संमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत. सोमवारी सायंकाळी ६ वाजता गडकरी रंगायतनमध्ये होणारा हा काव्यसोहळा विनामूल्य असून त्यास रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ahir: सचिन अहिरांचा उपसभापतीपदासाठी अर्ज; ठाकरे गटाला धक्का, शिंदेसेनेत जाणार, मुंबईच्या राजकारणात खळबळ

HSRP नंबरप्लेटची मुदत फक्त आज! किमान नोंदणी तरी करा, नाहीतर... दंडात्मक कारवाईसह १ जुलैनंतर तुमच्या गाडीची 'ही' कामे थांबणार

Latest Marathi News Live Update : शिंदेंची २ वाजता पत्रकार परिषद

Ayodhya Ram Mandir Donation Scam: "होय, माझी चूक झाली..." चंपत राय यांचा राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा खुलासा

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्वेंटी-२० वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये पोर्तुगालकडून खेळणार; ICC नियमांची पुर्तता, आता मैदान गाजवण्यास सज्ज

SCROLL FOR NEXT