मुंबई

मराठी राजभाषा दिन साजरा

CD

मराठी कला प्रकारांचे प्रभावी सादरीकरण
पोलादपूर (बातमीदार) : सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील भाषा वाङ्‍मय विभाग आणि मराठी विभाग यांच्या विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील ग्रंथालयातून ग्रंथदिंडी व ग्रंथपूजनाने झाला. या वेळी महाविद्यालयात पोलादपूर येथील प्रसिद्ध रंगावली कलाकार संदेश सुतार यांनी रांगोळीच्या माध्यमातून ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज यांचे चित्र रेखाटले. प्रसिद्ध शिल्पकलाकार प्रमोद दिक्षित यांनी दगडांना आकार देऊन साकारलेल्या विविध कलाकृतींचे छोटेखानी प्रदर्शन सर्वांसाठी आकर्षणाचे ठरले. या वेळी मुख्य कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाल्यानंतर प्रा. डॉ. प्रभाकर गावंड यांनी ''गर्जा महाराष्ट्र माझा'' हे महाराष्ट्र राज्य गीत सादर केले. कार्यक्रमामध्ये मराठी विभागाच्या वतीने निबंध, वक्तृत्व, पुस्तक परीक्षण आदी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र आणि बक्षिसे वितरित करण्यात आली.

रातवड विद्यालयात कुसुमाग्रजांना अभिवादन
माणगाव (बातमीदार) : माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृतिदिन आणि राजभाषा मराठी दिन सोमवारी (ता. २७) उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव सखाराम जाधव यांच्या हस्ते स्वा. सावरकर व वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव गीते सादर करून साहित्य व परंपरेचे सादरीकरण केले. अनेक विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान करून मराठी साहित्यातील विविध नामवंत लेखक, कवी यांची माहिती व जीवन परिचय करून दिला. शिक्षिका नेहा ऐत यांनी मराठी भाषेची महती सांगितली. सांस्कृतिक प्रमुख मनोहर पुरी, सहायक शिक्षक अजित शेडगे यांनी नियोजन केले होते. नृत्य, नाट्य, कविता व साहित्यिक चरित्रातून राजभाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सुतार आणि प्रास्ताविक कस्तुरी देवकर हिने केले.

माणगाव : माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT