मुंबई

धुळीच्या प्रदूषणाने मुलुंडकर हैराण

CD

मुलुंड, ता. २७ (बातमीदार) ः गेल्या काही महिन्यांपासून मुलुंडमधील प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. या वायुप्रदूषणामुळे मुलुंडमधील मॅरेथॉन अव्हेन्यू मार्ग येथील तब्बल २२ नागरिक आजारी पडले असल्‍याचे बोलले जात आहे. यासंदर्भात येथील नागरिकांनी प्रशासनाकडेही तक्रार केली असून प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा मुलुंडकरांचा आरोप आहे.
मुलुंडमधील या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी आमदार मिहिर कोटेचा यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना या प्रदूषणाबद्दल सर्व माहिती दिली. त्‍यावर कोटेचा यांनी प्रदूषणाला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुलुंड पश्चिमेतील एलबीएस मार्ग येथे सिव्हरेजचे काम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. या भागामधील साधारण एक किलोमीटरचा पट्टा पूर्णपणे खोदला गेला असल्‍याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्‍यामुळे या भागातील नागरिकांना श्वास घेण्यामध्ये अडचण येत आहे. २२ नागरिक श्वसन विकाराने त्रस्त असून ते सर्व जण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. महापालिका आयुक्त आणि सचिव सदस्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी क्लायमेट प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत प्रकल्पाशी संबंधित जबाबदार अधिकारी वर्गावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
- मिहिर कोटेचा, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गैस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

Latest Marathi Live Update :नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT