मुंबई

आठवर्षीय चिमुकलीची भैरवगड कड्यावर चढाई

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेल्या ग्रीहिता विचारे या आठवर्षीय चिमुरडीने भैरवगड कडा सर करत पुन्हा एकदा देदीप्यमान कामगिरी केली आहे. भैरवगड म्हटले की, किमान दोन तासांची दमछाक, रॉक कट क्लायंबिंग आणि झिप लाईन या सर्व बाबी डोळ्यांसमोर येतात. या अडचणींवर मात करत ग्रीहिताने यशस्वीपणे कामगिरी करून दाखवली आहे.

मुरबाड तालुक्यात वसलेला भैरवगड हा भल्याभल्यांना आव्हान देत असतो. किमान तीन हजार फुटांवर असलेला भैरवगड गाठण्यासाठी घनदाट जंगलातून पायपीट करत कड्याच्या पायथ्याशी पोहचावे लागते. ग्रीहिताने हे सर्व अडथळे पार केले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ऊन वाढायच्या आधी गड सर करायचे ठरले. पहाटे ५ वाजताच सर्व टीम गडाच्या पायथ्याशी पोहोचली. दोन तासात गड सर करण्यात आला. ग्रीहिताने हा गड अर्धा ते पाऊण तासात सर केल्याचे भूषण पवार यांनी सांगितले.

ग्रीहिताला ही कामगिरी फत्ते करण्यासाठी तांत्रिक मदत करणारे महादुर्ग ॲडव्हेंचरच्‍या भूषण पवार, सागर डोहळे, अक्षय जमदरे, नितेश पाटील, योगेश शेळके, विकी बुरकुले, कल्पेश बनोटे, ऋतुजा नेरकर आणि महाराष्ट्र रेंजरचे किशोर माळी यांची मोलाची साथ लाभली.
-----------------------------
महादुर्ग ॲडव्हेंचर या साहसी संघाच्या स्‍वयंसेवकांना गिर्यारोहण क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव असल्याने आणि तांत्रिक गोष्टींचे ज्ञान असल्याने किंचितही भीती लहान मुलांच्या मनात निर्माण होत नाही. त्यामुळे गिर्यारोहण सुरक्षित पार पडते.
- भूषण पवार, संस्थापक, महादुर्ग ॲडव्हेंचर
--------------------------------
सर्वात लहान गिर्यारोहक
ग्रीहिताच्या पाठीशी नेहमीच उभे राहणारे तिचे वडील सचिन विचारे यांची देखील ग्रीहिताच्या कामगिरीला मोलाची साथ लाभली आहे. या आधी ग्रीहिताने वजीर, नवरा नवरी सुळके सर केले आहे. त्यासोबत माऊंट एवरेस्टच्या बेस कॅम्पला जाणारी सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून तिची ओळख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT