मुंबई

संशयित दहशतवादी सरफराज मेमन अटकेत

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २८ : चीनमध्ये प्रशिक्षण घेऊन आलेल्या संशयित दहशतवादी सरफराज मेमन याला इंदूरमध्ये पोलिसांनी अटक केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दहशतवादी कारवायांबाबत इशारा दिला होता. यात मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती एनआयएने पोलिस आणि इतर यंत्रणांना दिली होती. या माहितीच्या आधारे इंदूर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतले.

एनआयएने पाठवलेल्या ई-मेलमध्ये मुंबई पोलिसांसाठी एक अलर्ट जारी केला होता. त्यात एक धोकादायक व्यक्ती मुंबईत पोहोचल्याचा इशारा देण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने ई-मेलमध्ये सरफराज मेमन नामक व्यक्तीचा उल्लेख होता. तो देशासाठी अत्यंत धोकादायक व्यक्ती असल्याचे एनआयएने नमूद करत पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सरफराजला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्र दहशतवादविरोधी शाखेचे पथक इंदूरमध्ये दाखल झाले आहे. तेथून सरफराजला पुढील तपासासाठी एटीएस मुंबईत आणणार आहे.

अधिक तपास सुरू
सरफराज मेमन मध्य प्रदेशाचा आहे. त्याने चीन व हाँगकाँगमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. एनआयएने मुंबई पोलिसांना त्याचे आधार कार्ड, वाहन परवाना व पासपोर्टही ई-मेल केला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी इंदूर पोलिसांशी संपर्क साधला. एनआयएने त्याचे नाव कोणत्याही दहशतवादी संघटनेशी अद्याप जोडलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT