मुंबई

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २८ : राज्य गृह विभागातर्फे मंगळवारी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये बऱ्याच दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या ८ आयपीएस अधिकाऱ्यांना पोस्टिंग मिळाली आहे. यात आयपीएस बिपिन कुमार सिंह यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर आयपीएस प्रभात कुमार यांना होमगार्डची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यातील एकूण ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह मंत्रालयाने जारी केले आहेत.

राज्य सरकारच्या बदली आदेशानुसार राजकुमार व्हटकर यांची विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथकेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विनीत अग्रवाल यांची म्हाडाच्या अपर पोलिस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारीपदी, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी जय जाधव, कैसर खालिद यांची मोटार परिवहन विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी, डी. के. पाटील भुजबळ यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर नांदेड विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षकपदी एस. एच. महावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अभिजीत शिवथरे यांना कायदा व सुव्यवस्था विभागाच्या सहायक पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. पौर्णिमा चौगुले यांना मिरा-भाईंदर, वसई-विरारच्या पोलिस उपायुक्तपदी, राहुल खाडे यांची जालना जिल्ह्याच्या अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. १५ दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT