मुंबई

आरोग्यदायी कलिंगडे बाजारात

CD

जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. १ ः मुंबई शहरात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. नागरिक वाढत्या उष्म्याने हैराण झाले आहेत. अशा वेळी शरीराला गारवा मिळण्याकरिता व भरपूर व्हिटॅमिन, प्रोटीन असलेले कलिंगड खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. बाजारातही मोठ्या प्रमाणात कलिंगड दाखल झाले आहेत.
मार्चमध्ये येणाऱ्या होळी सणानंतरच कडक उन्हाळा सुरू होतो. यंदा होळी येण्यापूर्वीच अंगाला चटके बसू लागले आहेत. उन्हाळ्यात शरीराला गारवा व पाण्याच्‍या पातळीचा समतोल राखण्याकरिता व्हिटॅमिन अ व क तसेच भरपूर प्रोटीन मिळण्याकरिता नागरिक रसाळ व स्वस्त फळे, रस पेयाबरोबर फ्रूट सलाड खाण्यास पसंती देत आहेत.

या कलिंगडला अधिक पसंती
मुंबईत कलिंगडांची आवक वाढली आहे. महाराष्ट्रसह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, अक्कलकोट या ठिकाणांहून येणाऱ्या कलिंगडमधील शुगर क्वीन, नामधारी व शुगर बेबी जातीचे कलिंगड खरेदी करताना ग्राहक दिसत आहेत.

दरात वाढ
कलिंगडाच्‍या दरात वाढ झाली असल्‍याचे विक्रेत्‍यांचे मत आहे. सहकार भांडार, विविध मॉलमध्ये कलिंगड कमीत कमी १५ ते २० रुपये किलोने मिळत आहेत. खुल्‍या बाजारात लहान ते मोठे असलेल्या कलिंगडानुसार किंमत ठरवली जात आहे. एक कलिंगड कमीत कमी ७० ते १०० रुपयांपर्यंत विकले जात आहे.

रसालाही पसंती
उपाहारगृहांत कलिंगड ज्यूस एक ग्लासची अंदाजे किंमत १२० रुपये आहे; तर साधारण उपाहारगृह व स्टॉलवर एक ग्लास कलिंगड ज्यूसची किंमत ४० ते ६० रुपये आहे.

कलिंडाला खूप मागणी आहे. विक्रीकरिता आणलेली कलिंगडे दुपारपर्यंत संपतात. हिरवी गार व लालबुंद कलिंगड खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
- जयवंत करंडे, विक्रेते

लालबुंद कलिंगड मुलांना खूप आवडतात. उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने खूप फायदा होतो. शरीराला गारवा मिळतो.
- लक्ष्मी पुजारी, ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT