मुंबई

पालकांनो, शिक्षकांच्या पाठिशी उभे रहा !

CD

किन्हवली, ता. २ (बातमीदार) : चंगळवादाकडे निघालेल्या नव्या पिढीमध्ये संस्कार, शिस्त आणि विधायक वृत्ती रुजवायची असेल तर पालकांनी खंबीरपणे शिक्षकांच्या पाठीशी उभे राहायला हवे. पालकच जर चुकणाऱ्या पाल्याला पाठीशी घालून शिक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू लागले, तर गुन्हेगार तयार व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन कोकण विभागाचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले. ते किन्हवलीत आयोजित सत्कार सोहळ्यात पालकांशी हितगूज साधताना बोलत होते.
किन्हवलीतील पार्वती-शंकर शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यामंदिर व पी. एस. धानके इंग्लिश माध्‍यम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा कलासंध्या २०२३ हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आणि नवनिर्वाचित शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा शहापूर तालुका शिक्षक सेना व मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार म्हात्रे यांनी उपस्थित शेकडो पालकांशी हितगूज साधत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे दत्तात्रय किरपण यांनी; तर सूत्रसंचालन संतोष दवणे यांनी केले. या वेळी हजारो विद्यार्थी-पालकांसह आदर्शचे संस्थापक अध्यक्ष विष्णू धानके, मुख्याध्यापिका सुजाता धानके आदींसह मान्यवर उपस्थित होते. बालकलावंतांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांनी भरभरून दाद देत रोख बक्षिसे दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT