मुंबई

केईएम रुग्णालयात ६५० हून अधिक रुग्णांना कॉक्लिअर इम्प्लांट बसवले

CD

जागतिक श्रवण दिवस विशेष
ऐकू न येण्याच्या समस्येतून कॉक्लिअर इम्प्लांटमुळे सुटका
कर्णबधिरांसाठी ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ वरदान
‘केईएम’मध्ये ६५० हून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : जन्मजात कर्णबधिर किंवा काही काळापर्यंत ऐकू आल्यानंतर बहिरेपण येणाऱ्या समस्यांवर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रियेनंतर संबंधित व्यक्तीला ऐकू येऊ लागते; पण ती एका विशिष्ट वयात केली तर त्याचा फायदा होऊन तिचे आयुष्य सुखकर बनण्यास मदत होते. केईएम रुग्णालयामुळे अनेकांना आपल्या आयुष्यात असा आनंद अनुभवता आला आहे. ‘केईएम’मध्ये २००७ ते २०२३ दरम्यान जवळपास ६५० हून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या कॉक्लिअर इम्प्लांट बसवण्याचा विक्रम डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे कर्णबधिरांना दिलासा मिळाला आहे.
केईएममध्ये संपूर्ण भारतातील रुग्ण उपचारांसाठी दाखल होतात. ओपीडीत येणाऱ्या १० रुग्णांपैकी फक्त एकाचीच शस्त्रक्रिया केली जाते. कारण अशा शस्त्रक्रियेसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना फार धावपळ करावी लागते. बऱ्याच संस्थांशी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यातून निधी गोळा करावा लागतो.

मोफत शस्त्रक्रियेने वाढता प्रभाव
एका व्यक्तीला कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी जवळपास ६ ते १५ लाखांपर्यंत खर्च येतो; पण केईएम रुग्णालयाने त्या मोफत केल्या आहेत. वेगवेगळ्या धर्मादाय संस्था आणि एनजीओच्या मदतीने व क्राऊड फंडिंग करून ते शक्य झाले, असे केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

दोन वर्षांपर्यंत केलेली शस्त्रक्रिया लाभदायक
कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया परदेशात आणि केरळातही दोन वर्षांखालील मुलांमध्ये केली जाते. भारतात ती पाच वर्षांपर्यंत करण्याची मर्यादा आहे. पण, दोन वर्षांपर्यंत केलेल्या शस्त्रक्रियेचे सकारात्मक परिणाम दिसतात. त्यामुळे शस्त्रक्रियेचा कालावधी कमी करण्यासाठी पालिकेचे कान-नाक-घसा विभागाचे सर्जन प्रयत्न करत आहेत, असे कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल मारफातिया यांनी सांगितले.

१० टक्के प्रौढ
केईएम रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियांपैकी १० टक्केच रुग्ण प्रौढ आहेत. त्यात ९ ते ८२ वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांचा समावेश आहे. एका काळापर्यंत ऐकू येत होते-बोलता येत होते; पण काही काळानंतर अचानक ऐकू येणे बंद झाले, अशा नागरिकांचा त्यात समावेश असतो. ऐकू न आल्यामुळे बोलता येत नसलेले नागरिक किंवा लहान मुले नैराश्यात जातात. ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यामुळे अशा नागरिकांनी उपचारांसाठी पुढाकार घ्यावा, असे डॉ. हेतल मारफातिया यांनी सांगितले.

अशी असते कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया
सामान्यपणे मातेच्या गर्भातच बाळाला ऐकू येते; पण दोन ते अडीच वर्षांपर्यंत त्याला ऐकू येत नसेल तर कानाच्या आत आणि बाहेर शस्त्रक्रिया करून कॉक्लिअर इम्प्लांट बसवले जाते. तीन आठवड्यानंतर त्या मशीनचे स्विच ऑन केले जाते. त्यानंतर बाळाला ऐकून बोलण्याची थेरपी घ्यावी लागते. त्यानंतर बाळ किंवा प्रौढ व्यक्ती बोलू-ऐकू शकते. बाळ बोलत नसेल किंवा हाक देऊनही प्रतिसाद देत नसेल तर आई-वडिलांनी त्याच्यावर तात्काळ उपचार करून घेणे गरजेचे आहे.

लावण्याचे आयुष्य आता सर्वसामान्यांसारखे
भांडुपमध्ये राहणाऱ्या पाच वर्षीय लावण्या चौधरीचा जन्म डिसेंबर २०१३ ला झाला. जन्मानंतर तब्बल एक वर्ष तिच्या आई-वडिलांना ती ऐकू शकत नाही याची जाणीव नव्हती. ती पावणेदोन वर्षांची झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्या कानांची तपासणी केली. तेव्हा ती ऐकत नसल्याने बोलूही शकत नसल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी डॉ. हेतल मारफातिया यांची भेट घेतली. डॉक्टरांनी २०१५ मध्ये एका कानाची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर २०१७ मध्ये दुसऱ्या कानाची शस्त्रक्रिया करून कॉक्लिअर इम्प्लांट बसवले. आता लावण्या इतर मुलींसारखी शाळेतही जाऊ लागली आहे. सर्वसामान्य आयुष्य जगत असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT