मुंबई

मालमत्ता कराविरोधात रणशिंग

CD

कामोठे, ता. ४ (बातमीदार) : नैना प्रकल्पापाठोपाठ महाविकास आघाडीने पनवेल महापालिकेने नागरिकांवर लादलेल्या मालमत्ता करविरोधात पुन्हा रणशिंग फुंकले आहे. याबाबत बुधवारी (ता.२) पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात झालेल्या बैठकीत १३ मार्चला महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
प्रस्तावित नैना प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध वाढत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शेकापने गावागावात नैना प्रकल्पाविरोधात रान उठवले आहे. त्यापाठोपाठ आता महाविकास आघाडीने पनवेल महापालिका आणि सत्ताधारी भाजपविरोधात मोर्चा उघडला आहे. ऐरणीवर आलेला मालमत्ता कराचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मालमत्ता कराचा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. नुकत्याच ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात झालेल्या बैठकीत मालमत्ता कराविरोधात १३ मार्चला पनवेल महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
---------------------------------------------
गावोगावी जनजागृतीवर भर
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच महापालिकेने पूर्वलक्षी प्रभावाने नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी नोटीस पाठवल्यामुळे नागरिक नाराज असून भाजप नेत्यांची भूमिका संदिग्ध आहे. त्यामुळे आघाडीचे प्रमुख नेते गावोगावी जनजागृती करणार आहेत.
-----------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT