मुंबई

लॅक्मे फॅशन वीकमध्ये खादी इंडिया शोकेस

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ४ : ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये खादी इंडियाकडून खादी इंडिया शोकेसची घोषणा करण्यात आली आहे. खादीचे सौंदर्य आणि वैभव अधोरेखित करण्याच्या उद्देशाने खादी इंडिया शोकेसचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आघाडीचे अनेक डिझायनर एकत्र आले आहेत. फॅशन डिझाईन काऊन्सिल ऑफ इंडियाच्या भागीदारीत आणि ९ मार्च रोजी फॅशन डेचा एक भाग म्हणून लॅक्मे फॅशन वीकमध्ये खादी इंडिया शोकेस आयोजित करण्यात आले आहे.

खादी इंडियात मल्टिडिझाईन शोकेस कलेक्शन असणार आहेत. त्यासोबत डिझायनर दिव्यम मेहता, सुकेत धीर आणि श्रुती संचेती यांचे खादी कलेक्शन प्रदर्शित केले जाणार आहे. साड्यांचे डिझाईन फॉर्म गोंड, मधुबनी आणि पिचवाई चित्रांच्या पारंपरिक लोककलांपासून प्रेरित आहेत. डिझायनर दिव्यम मेहता यांचे खादी कलेक्शनमध्ये ग्रामीण भागातील भिंती चित्रकलेचे एकत्रीकरण केले आहे. डिझायनर सुकेत धीर यांच्या स्प्रिंग फॉरेस्ट कलेक्शनमध्ये पुरुषांसाठी विविध ऋतूंमध्ये खादीच्या वापराची संकल्पना साकारण्यात आली आहे. कापूस आणि सुती रेशमामध्ये विणलेल्या वेगवेगळ्या खादीसह उन्हाळी आणि हिवाळी खादी वस्त्रे कलेक्शनचा भाग आहे.

डिझायनर श्रुती संचेती यांनी डिझाईन केलेल्या खादी कलेक्शनवर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अविभाज्य भाग असलेल्या खड्डेर खादी वस्त्राचा वापर केला आहे. या कलेक्शनमध्ये विदर्भातील लहान विणकरांनी विणलेल्या कापूस आणि रेशीम खादीचा समावेश आहे. कलेक्शनमध्ये खादीपासून तयार केलेले डस्टर जॅकेट्स, बोलेरो, को-ऑर्डर सेट, लेयर फ्रेंडली ड्रेस, कुर्तेदेखील आहेत. ‘फॅब्रिक ऑफ नेशन’ने डिझायनरच्या अनेक पिढ्यांना फॅशनमध्ये प्रोत्साहन दिले आहे. संपूर्ण भारतभर खादी शाश्वत फॅशन आणि अंतिम लक्झरीचे प्रतीक म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT