मुंबई

करवसुलीसाठी महापालिका अधिकारी मैदानात

CD

भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्‍यांच्या खांद्याला खांदा लावून मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा अधिकारीवर्गही मैदानात उतरला आहे. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व सहायक आयुक्त सुट्टीच्या दिवशीदेखील वसुली करत असून शनिवारी एकाच दिवसात तब्बल ७७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे करवसुलीचा आकडा आता १५७ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
यंदाच्या वर्षी मालमत्ता कराची विक्रमी वसुली करण्याचे आदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी दिले आहेत. त्यानुसार कर विभागातील कर्मचाऱ्‍यांची निरनिराळी पथके तयार करून करवसुली करण्यात येत आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वीच करवसुलीचा दीडशे कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. आता आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे पंचवीस दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे जास्तीत जास्त करवसुली होणे आवश्यक असून यंदा किमान दोनशे कोटी रुपये करवसुली करण्याचे उद्दीष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. यासाठी आता स्वत: अधिकारीच करवसुलीसाठी मैदानात उतरले आहेत. कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांच्यासह चार उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सर्व प्रभागातील प्रभाग अधिकारी कर वसुल करण्यासाठी मोठ्या थकाबाकीदारांकडे जाऊ लागले आहेत.
एक लाख रुपयांच्या वर थकबाकी असलेल्यांकडे अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त जात आहेत. तर दहा हजारांच्यावर थकबाकी असलेल्यांकडे सहायक आयुक्त व प्रभाग अधिकारी जात आहेत. यात विशेष करून शहरातील मॉल, हॉटेल, स्टुडिओ तसेच वीस ते पंचवीस लाखांपर्यंत थकबाकी असलेली मोठी गृहसंकुले यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी बड्या थकबाकीदारांकडून करवसुली करण्यासाठी त्यांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई केली जात होती. मात्र याविरोधात राज्य मानवाधिकार आयोगाकडे धाव घेण्यात आल्यानंतर आयोगाने महापालिकेला नळजोडणी खंडित करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे यंदा केवळ थकबाकीदारांची मालमत्ता जप्तीची कारवाई प्रशासनाकडून केली जात आहे.
...
लोकप्रतिनिधींकडून वसुली
महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपुष्टात आली आहे. यातील अनेक माजी नगरसेवकांकडे कराची थकबाकी आहे. अशा लोकप्रतिनिधींना कर भरण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. महापालिकेची आगामी निवडणूक लढवायची असेल तर महापालिकेचा संपूर्ण कर भरणे आवश्यक आहे. माजी नगरसेवक तसेच निवडणूक लढवू इच्छूक असणाऱ्‍यांना याची जाणीव प्रशासनाकडून करून देऊन त्यांच्याकडून कर वसूल केला जात आहे. झोपडपट्ट्यांच्या मालमत्ता कराचे हस्तांतरण करण्यासही महापालिकेने सुरुवात केली असल्यामुळे त्यांच्याकडे असलेली थकबाकी भरली तरच कराचे हस्तांतरण केले जाईल असे सांगून झोपडपट्टीधारकांकडूनही कर वसुल केला जात आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून दररोज अंदाजे ७५ लाख रुपयांची करवसुली होत आहे तर शनिवारी एकाच दिवशी ७७ लाख रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे कर वसुली आता १५७ कोटी झाली आहे अशी माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.

-------------------------------------

भाईंदर : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त संजय शिंदे, जनसंपर्क अधिकारी राज घरत, सहायक आयुक्त बोरसे हे अधिकारी मैदानात उतरले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT