मुंबई

एपीएमसीतील व्यापाऱ्याला गंडा

CD

नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : दिल्लीतील एका व्यापाऱ्यासह दलालाने एपीएमसी मार्केटमधील एका मसाल्याच्या व्यापाऱ्याकडून पावणे दोन कोटींची ५० टन लवंग खरेदी करून व्यवहारातील तब्बल एक कोटी ३२ लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी दिल्लीतील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव पार्थ कोठारी (वय ३४) असे असून ते एपीएमसी मार्केटमध्ये मसाल्याचा व्यापार करतात. कोठारी यांनी पाच वर्षांपूर्वी मे. पूनम स्पाईसचे मालक दिलीप मारू याच्यासोबत दोन कोटींचा मसाले खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. त्या दोन्ही व्यवहारांचे पैसे दिलीप मारू याने कोठारी यांना दिले होते. त्यामुळे कोठारी यांचा मारूवर विश्वास बसला होता. त्यामुळे दिलीप मारू याने सुचवलेल्या दिल्ली येथील आसाम सुपारी ट्रेडर्स व महिमा इंटरनॅशनलचे अजय गुप्ता याच्यासोबत व्यवहार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कोठारी यांनी अजय गुप्ता याला दिलीप मारू याच्या मध्यस्थीने सुमारे पावणे दोन कोटींची ५० टन लवंग दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SAW vs BANW Live: दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली! भारताला स्पर्धेबाहेर फेकले? हरमनप्रीत कौरच्या संघाला एकच गोष्ट वाचवू शकते

CISF Bus Accident: कटरामध्ये CISF जवानांच्या बसला भीषण अपघात; ९ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर, कशी घडली घटना?

Helicopter Crash: आक्रोश, धूर आणि मृत्यू... सौदी अरेबियात भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना; अरामकोचे हेलिकॉप्टर कोसळून १४ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! फ्रान्समध्ये विमान कोसळलं, पाच विद्यार्थ्यांसह ११ जणांचा मृत्यू

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... भारतीय संघात दोन खेळाडूंचे पदार्पण; कोण आहेत ते? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT