मुंबई

मुख्यमंत्री शिंदे आज नवी मुंबईत

CD

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या वतीने (उमेद) नवी मुंबईत पहिल्यांदाच वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. उद्यापासून (ता. ८) सुरू होणारे राज्यस्तरीय प्रदर्शन १९ मार्चपर्यंत चालणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या प्रदर्शनाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, ग्रामीण क्रयशक्तीला बाजारपेठ मिळून त्यांची व्यवसायवृद्धी व्हावी, असा प्रदर्शनाचा उद्देश आहे. दरवर्षी मुंबईतील वांद्रे येथे भरवण्यात येणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन यंदा नवी मुंबईत भरवण्यात येत आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये साधारण ५११ स्टॉल असणार आहेत. महाराष्ट्रातील ३५० आणि देशभरातून साधारण ११९ स्टॉल येणार आहेत. तसेच नाबार्डचे ५० स्टॉल यात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT