मुंबई

महिला रेल्वे प्रवाशांचा काळ्या फिती लावून प्रवास

CD

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ८ : घर चालविण्यासाठी, तसेच करिअरच्या दृष्टीने महिला नोकरी, व्यवसाय करत आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महिलांसाठी रेल्वेकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांमध्ये मात्र वाढ झालेली नाही. महिला प्रवाशांसाठी आजही लोकलमध्ये केवळ तीन डबे आहेत. रेल्वेतील प्रवास सुरक्षित नाही, अशा अनेक समस्यांविषयी लक्ष वेधूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने महिला प्रवाशांनी महिला दिनी काळ्या फिती लावून प्रवास करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. आसनगाव, बदलापूर, कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली, टिटवाळा, ठाणे रेल्वेस्थानकातील महिलांचा या आंदोलनाला जास्त प्रतिसाद लाभला.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय ट्रेनमधील महिलांची वाढत जाणारी गर्दी व प्रवासातील महिलांची असुरक्षितता याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ, तेजस्विनी महिला प्रवासी संघटना आणि महिला प्रवाशांनी बुधवारी महिला दिनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. डोंबिवली स्थानकातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला नोकरदार वर्गाची आणि तिकीट-पास काढून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. असे असले तरी रेल्वेने महिलांसाठी अद्यापही डबे वाढवलेले नाहीत.

काही रेल्वेस्थानकांत महिलांसाठी स्वच्छ शौचालयांची सोय केलेली दिसत नाही. कधी-कधी तर शौचालये चक्क कुलूपबंद अवस्थेत दिसून येतात. अशा वेळी महिलांची फारच कुचंबणा होताना दिसते, अशा अनेक समस्या महिला प्रवासी सहन करत आहेत. यासाठी महिला प्रवासी संघटनेतर्फे डोंबिवली रेल्वेस्थानकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काळ्या फिती लावून हे निषेध आंदोलन केल्याचे प्रवासी महिला संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी सांगितले.
--------------------------------------------------
महिलांचा प्रवास असुरक्षित
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रातील महिलांना समान संधी व अधिकार देणे याची आठवण करून देण्यासाठी आहे; पण पुरोगामी महाराष्ट्रातील व भारताची आर्थिक राजधानी म्हणून जगभरात ओळख असलेल्या मुंबई शहरातील उपनगरीय रेल्वे प्रवासी महिलांना आजही त्यांच्या समान हक्क व अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवासी महिलांची फार मोठ्या प्रमाणात अवहेलना होतेय. त्यामुळे त्यांचा रोजचा प्रवास हा असुरक्षित झाला आहे.
------------------------------------------
सहा महिन्यांपूर्वी महिलांच्या विविध मागण्यांसाठी डीआरएमची भेट घेऊन निवेदन सादर केले होते, पण त्याची त्यांनी दखल न घेता नेहमीप्रमाणे कचऱ्याची पेटी दाखवली. आठ दिवसांपूर्वी पुन्हा निवेदन सादर करत आठवण करून दिली. तसेच आंदोलनाची कल्पना दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
- लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
---------------------------------------------------
या आहेत मागण्या...
१) उपनगरीय रेल्वेच्या वाढत जाणाऱ्या गर्दीचे विभाजन करण्याकरिता कार्यालयीन वेळेत बदल करणे.

२) महिला प्रवाशांकरीता बोगीची संख्या वाढविणे.

३) एसी ट्रेन, फर्स्ट क्लास डब्यातील अनधिकृत प्रवासी यांना रोखण्यासाठी सर्व स्थानकांवर टीसीची नेमणूक करणे.

४) सर्व उपनगरीय स्टेशन परिसरातील, तसेच पुलावरील अनधिकृतपणे बसणारे फेरीवाले यांना तात्काळ उठवणे.

५) उपनगरीय ट्रेनमधील महिलांच्या डब्यातून विक्री करणाऱ्या पुरुष फेरीवाल्‍यांना बंदी घालणे.

६) रेल्वे परिसरात लहान बालकांना भीक मागायला, तसेच सामान विक्री करायला लावणाऱ्या पालकांवर कायदेशीर कारवाई करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT