मुंबई

पाणीटंचाईच्‍या झळा

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना राबवूनही पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. यंदाच्या वर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस पडूनही फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहापूर तालुक्यातील ३६ गावपाड्यांवर पाणीटंचाईची झळ पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहिली वाढत असल्याने भविष्यात पाणीटंचाईच्या झळा अधिकच भीषण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठाणे हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात भातसा, तानसा आणि बारवी अशी मोठी धरणे आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुबलक प्रमाणात पाऊस झाला असून, धरणांच्‍या साठ्यातदेखील वाढ झाली होती. मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे वाढलेली उष्णता, त्यामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन यांमुळे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांवर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. जिल्हा प्रशासनाकडून धरणांत असलेल्या मुबलक साठ्यामुळे पाणीटंचाईचे संकट तूर्तास टळले असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे धरण क्षेत्रांतील तालुक्यांमधील अनेक गावपाड्यांवर पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात साधारणत: दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात पाणीटंचाईच्या समस्या भेडसावण्यास सुरुवात होऊन त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असतो. त्यात मागील वर्षी जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती.
---------------------------------
शहापूर तालुक्‍यावर संकट गडद
अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस होऊनही यंदा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. शहापूर तालुक्यातील नऊ गावे आणि २७ पाड्यांवर आठ टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईचे संकेत आतापासूनच मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT