मुंबई

महिलांनी कृषी शिक्षणातून स्वावलंबी व्हावे

CD

कासा, ता. ८ (बातमीदार) : पुरुष शिकला की तो फक्त स्वतः शिकतो; मात्र स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकते. यानुसार शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रातून घेऊन महिलांनी स्वावलंबी झाले पाहिजे, असे मत डहाणू येथील उपवनसंरक्षक मधुमीता यांनी केले. कृषी विज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव, गृह विज्ञान शास्त्रज्ञ रुपाली देशमुख, अभियंता अनुजा दिवटे, पीक संरक्षण तज्ज्ञ उत्तम सहाणे, शिवणकला वर्ग शिक्षिका सोनवणे, उमेद प्रवर्तक मोनीता रॉय आदी मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. तरीही समाजात असमानता असून ती कमी करण्यासाठी स्वतःच्या घरापासून प्रयत्न करण्याचे आवाहन मधुमीता यांनी याप्रसंगी केले. महिला सबलीकरणासाठी कृषी विज्ञान करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
महिला आई, बहीण, मुलगी, पत्नी, आजी अशा विविध भूमिका तन्मयतेने साकारताना दिसतात. महिलांकडे संयम, सहनशीलता असे उपजतच गुण असल्याने प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. तरी महिलांनी स्वत:ला वेळ देऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रा. रुपाली देशमुख यांनी केले.
शास्त्रज्ञ अनुजा दिवटे यांनी, श्रम निर्मूलनासाठी विविध तंत्रज्ञान विकसित केले असून महिलांनी त्याचा अवलंब करावा, असे आवाहन केले. प्रवर्तक मोनिता राय यांनी महिलांनीच महिलांच्या विकासासाठी संघटित झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी सांगून कृषी विज्ञान केंद्र महिलांसाठी करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सेंद्रिय शेतीमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल कीर्तिका पाटील यांचा उपवनसंरक्षक मधुमीता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedarnath: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, यात्रेकरू थोडक्यात बचावले...थरारक व्हिडिओ पाहा

मागच्या वर्षी 1 हजार, पण यंदा 10 हजार टँकर, सरकारचं दुष्काळाकडे लक्ष नाही; शरद पवारांची टीका

Sharmin Segal: "ती माझी भाची आहे म्हणून नाही तर..."; 'हिरामंडी'मध्ये शर्मीनला कास्ट करण्यावर अखेर भन्साळींनी सोडलं मौन

Pune Porsche Accident: 'कारमध्ये 4 जण होते, ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला'; पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

Team India Coach: 'दबाव अन् राजकारण...', भारताच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेबद्दल केएल राहुलने ऑस्ट्रेलियन दिग्गजाला काय दिला सल्ला?

SCROLL FOR NEXT