मुंबई

जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील इमारत पाडकामास सुरुवात

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : गोरगरिबांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाची सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे वाटचाल सुरू आहे. रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेत, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेली आणि धोकादायक असलेली एआरटी, टीबी आदी विभाग असलेल्या जुन्या इमारतीच्या पाडकामास अखेर सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजनदेखील पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णालयावर ताण वाढत आहे. याची दाखल घेत, दोन वर्षांपूर्वी सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याला सरकारने परवानगी देत, ५७४ खाटांचे रुग्णालय बांधण्याचे ठरले होते. मात्र, भविष्यातील वाढत्या नागरीकरणाचा विचार करत खाटांची संख्या ९०० करण्यात आली. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ९०० बेड्‍सच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी अखेर ५२७ कोटींच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नुकत्याच राज्य सरकारने काढलेल्या आदेशात येथील १८ इमारती पाडण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार सिव्हिल रुग्णालयाच्या जुन्या इमारतींचे बांधकाम तोडण्याचे काम चालू झाले आहे. सुरुवातीला एआरटी, ओपीडी, नेत्र विभाग, रक्त, टीबी इमारत खाली करून हे बांधकाम पाडले जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

सिव्हिल रुग्णालयातील बांधकाम पाडण्यापूर्वी रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्ण विभाग वागळे इस्टेट येथील आरोग्य विभागाच्या शासकीय जागेत स्थलांतरित करण्यात आला आहे. यामध्ये डिलिव्हरी वॉर्ड, लहान मूल, अतिदक्षता विभाग, कुपोषित बालकांचे सेंटर, नेत्र विभाग, ब्लड बँक, प्रयोगशाळा, किचन, सर्जरी, ऑर्थो, फिजिओथेरपी, अपघात विभाग, आयुष, शवागृह आदींचा समावेश आहे.

हेलिपॅडचाही समावेश
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या १० मजली दोन अद्ययावत इमारतींत तीन बेसमेंट असून यामध्ये २०० सुपर स्पेशालिटी बेड आणि महिला, लहान मुले, डिलिव्हरीसाठी २०० खाटा, तर ५०० बेड जनरल अशा एकूण ९०० खाटांचे रुग्णालयाचे स्वरूप आहे. रुग्णांच्या सेवेसाठी हेलिपॅडचाही समावेश आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील जुन्या इमारतीच्या पाडकामास सुरुवात करण्यात आली आहे. हे काम सुरू असताना रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच बांधकाम पाडताना जुन्या ऐतिहासिक वस्तू जतन केल्या जाणार आहेत. यामध्ये दगडी बांधकाम असलेले हेरिटेजचे दगड, पुतळे किंवा इतर मिळणाऱ्या वस्तू सांभाळून ठेवण्यात येतील.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT