मुंबई

वाड्यात क्रिसीव्ह इंडस्ट्रीज कंपनीला आग

CD

वाडा, ता. ९ (बातमीदार) ः तालुक्यातील उसर ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या क्रिसिव्ह इंडस्ट्रीज या कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत कंपनी जळून खाक झाली आहे.
क्रिसिव्ह इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये वाहनांचे जुने टायर जाळून त्यापासून ऑईल तयार करण्याची प्रक्रिया केली जात आहे. आज दुपारच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले असले तरी जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी वसई व भिवंडी येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांना पाचारण करण्यात आले; परंतु २५ ते ३० कि. मी. अंतरावरून अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत कंपनी जळून खाक झाली. वाड्यात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे उद्योग क्षेत्रातील मालकवर्ग धास्तावला असून वाड्यात स्वतंत्र अग्निशमन दल असावे, ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांनी घेतली राज्यसभेच्या खासदरकीची शपथ; पवार कुटुंबाच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेत

भुवनेश्वर कुमारने CSK च्या आयुष म्हात्रेला आऊट करताच इतिहास घडवला; IPL मध्ये 'हा' कारनामा करणारा पहिलाच ठरला

Nashik : अमेरिकेहून २ दिवसांपूर्वीच परतलेला, मित्रांसोबत फिरायला गेल्यावर अपघात; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Iran War Aid India : पठ्ठ्यानं १० रुपयांचं अंडं २५ हजारांना खरेदी केलं! इराणसाठी भारतीय व्यक्तीची अनोखी मदत

'आदेश बांदेकरला असं का नाही वाटलं, की...' दिगंबर नाईकांना सांगितला तो प्रसंग, म्हणाले... 'रात्री पावणे बारा वाजता मला ज्या मालिकेतून काढलं ती...'

SCROLL FOR NEXT