मुंबई

दत्तक मुलांच्या मातानांही विशेष रजा

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० ः राज्य सरकारच्या सेवेत गर्भवती माता किंवा दत्तक मूल घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची भरपगारी विशेष रजा दिली जाते. त्याच धर्तीवर आता एसटी महामंडळात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी जर दत्तक मूल घेतल्यास त्यांना १८० दिवसांची विशेष रजा लागू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने तसा निर्णय घेतला असून, त्यासंबंधी परिपत्रक काढून महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांना अंमलबजावणीसाठी पाठवण्यात आले आहे. ही रजा ८ मार्चपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे.

मूल दत्तक घेण्याच्या दिवशी मुलाचे वय १ वर्षाच्या आत असेल तर १८० दिवसांची रजा लागू राहणार आहे; तर १ वर्षापेक्षा अधिक ते ३ वर्षांपर्यंत वयाचे मूल दत्तक घेतल्यास मूल दत्तक घेण्याच्या तारखेपासून ९० दिवस रजा लागू राहील. या रजा भरपगारी राहणार असून, त्याला खर्ची करण्यात येणार नसल्याचेही महामंडळाने परिपत्रकात सांगितले आहे. त्याशिवाय रजा घेताना प्रशासनाकडे मूल दत्तक घेण्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे किंवा कायदेशीर कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. रजा मंजुरीसाठी दत्तक संस्थेची कागदपत्रे आवश्यक असतील, न्यायालयीन आदेशाची गरज राहणार नाही. मात्र, न्यायालयाचा अंतिम आदेश एसटी प्रशासनाला सादर करावा लागणार आहे.
-------------
रजेसाठी या आहेत अटी
- दत्तक मुलाचे वय एक महिन्याहून कमी असेल तर एक वर्षाची रजा
- दत्तक मुलाचे वय ६ महिने आणि त्याहून जास्त; परंतु ७ महिन्यांहून कमी असेल तर ६ महिन्यांची रजा
- दत्तक मुलाचे वय ९ महिने आणि त्याहून जास्त; परंतु १० महिन्यांहून कमी असेल तर ३ महिन्यांची रजा.

यांना नसेल विशेष रजा
दोनपेक्षा कमी अपत्य हयात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना एकदा विशेष रजा घेतल्यानंतर प्रसूती रजा, दत्तक मुलांसाठी, तसेच सरोगसीसाठी असलेली विशेष रजा लागू राहणार नाही. या रजेसाठी सेवा कालावधीची अट राहणार नसून, रजेसाठी अर्ज करताना बंधपत्र द्यावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT