मुंबई

महिलाप्रवाशांच्या नशिबी ‘अ’स्वच्छतागृह

CD

कॉमन इंट्रो
लोकल सेवा ही मुंबई आणि उपनगराची लाईफलाईन समजली जाते. रोज लाखो प्रवासी या लाईफलाईनमधून आपला प्रवास करतात. या प्रवाशांमध्ये महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे, पण प्रवासादरम्यान एखाद्या स्थानकावर उतरल्यावर सुस्थितीतील शौचालयही या महिला प्रवाशांच्या नशिबी नसल्याची विदारक स्थिती ठाणे ते बदलापूर स्थानकात दिसून आली आहे. अस्वच्छता, दुर्गंधी, सोयी-सुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांना महिला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. ही स्वच्छतागृहे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र स्त्री-शक्तीचा जागर होत असताना महिला रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या या कुचंबनेचा ‘सकाळ’च्या टीमने घेतलेला हा आढावा...
--------------------
गायत्री ठाकूर, डोंबिवली
कल्याणच्यापुढे अगदी बदलापूरपासून रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोजचा त्यांचा रेल्वे प्रवास किमान दीड ते दोन तासांचा असतो. या काळामध्ये जर शौचालयात जाण्याची वेळ आलीच तर करायचे काय, हा प्रश्न या महिलांना नेहमी सतावतो. विशेषत: मासिक पाळीच्या वेळी त्‍यांना सर्वाधिक गैरसोयींना सामोरे जावे लागते.
---------------------
बदलापूर, अंबरनाथमध्‍ये स्‍वच्‍छता
बदलापूर व अंबरनाथ रेल्वेस्थानकाची पाहणी केली असता, फलाट क्रमांक ३ वर महिलांसाठी एक शौचालय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या शौचालयांची अतिशय गंभीर अवस्था होती, मात्र आता स्थानिक रेल्वे कर्मचारी स्वच्छतेकडे लक्ष देत असल्याने हे शौचालय वापराच्या स्थितीत आहे. महिला प्रवाशांनीदेखील हे शौचालय आम्ही वापरतो व स्वच्छ असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी दिल्या.

उल्‍हासनगरात बकाल स्‍वरूप
उल्हासनगर रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक २ वरील महिला शौचालयाचे तर अतिशय बकाल स्वरूप पाहायला मिळते. या ठिकाणी अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या शौचालयाचा वापर महिला करतच नाहीत. मात्र या ठिकाणी असलेल्या शौचालयाची सफाई केली. स्वच्छता राखली तर नक्कीच याचा वापर केला जाईल, असे येथील महिला प्रवाशांनी म्हटले आहे.

विठ्ठलवाडीची चावी टीसी कार्यालयाकडे
विठ्ठलवाडी रेल्वे फलाट क्रमांक एक व दोनवरील महिला शौचालय हे रात्री-अपरात्री कोणी चोर, गर्दुल्ले यांनी वापरू नये यासाठी शौचालयाला कुलूप असते व याची किल्ली टीसी कार्यालयात ठेवली जाते. ज्या महिलांना हे शौचालय वापरायचे असेल त्यांनी टीसी कार्यालयातून चावी घेऊन शौचालयाचा वापर करून झाल्यानंतर चावी पुन्हा टीसी कार्यालयात जमा करण्यासंदर्भातील नोटीस शौचालयाच्या दारावर लावण्यात आली आहे. यामुळे या शौचालयाची योग्य ती काळजी घेण्यास मदत होत असल्याचे येथील स्थानिक रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT