मुंबई

रवींद्र प्रभुदेसाई यांचा षष्ठपूर्ती सोहळा उत्साहात

CD

ठाणे, ता. १२ : पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्येष्ठ मराठी उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा शुक्रवारी (ता. ३) ठाणे येथील आयलीफ रिट्स बँक्वेट सभागृहात पार पडला. यानिमित्त पितांबरीचे उत्पादन रुचियाना गूळ पावडर दान करण्याच्या उद्देशाने रवींद्र प्रभुदेसाई यांची तुला करण्यात आली.
या सोहळ्यात प्रभुदेसाई यांच्या कुटुंबीयांसोबतच सॅटर्डे क्लब, उद्योग अनुभव प्रतिष्ठान, कऱ्हाडे
ब्राह्मण संघ, बिझनेस फोरम या संस्थांचे पदाधिकारी तसेच ठाणे शहरातील संघ परिवार, कलाकार, सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.
मराठी उद्योजक म्हणून गेली ३४ वर्षे राज्याच्या उद्योग क्षेत्रात प्रभुदेसाई यांचे मोठे योगदान आहे. याच अनुषंगाने ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी त्‍यांना मुलाखतीच्या माध्यमातून बोलते केले आणि त्यांचा ६० वर्षांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. दरम्यान, कोकणात पर्यावरणपूरक काम करण्यासाठी पितांबरीच्या माध्यमातून सात लाख वृक्षलागवड केली असून भविष्यात एक कोटी झाडे लावण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या वेळी प्रभुदेसाई यांच्यावर तयार करण्यात आलेला माहितीपट दाखवण्यात आला.
-----------------
प्रत्येकी ६० हजाराचा धनादेश
गेली अनेक वर्षे प्रभुदेसाई वाढदिवसानिमित्त स्वतःच्या वयाइतक्या रकमेची देणगी काही सामाजिक संस्थांना देतात. त्यानुसार यावर्षीही ६० व्या वाढदिवसानिमित्त १२ वर्षे व त्याहीपेक्षा अधिक कार्यकाळ कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांना प्रत्येकी ६० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकरांचा पाय आणखी खोलात! SIT चौकशीनंतर EDचे समन्स? पदाचा वापर करत आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

'ती परत येतेय...' सनई चौघडे मालिकेत नव्या अभिनेत्रीची एण्ट्री, नेटकऱ्यांचा अंदाज बरोबर?

Latest Marathi News Live Update : लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे ३ हजार याच आठवड्यात मिळण्याची शक्यता

Nagpur News: कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाचा खून; अंबाझरीतील पहाटेची घटना ; दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम? सोन्याचे भाव घसरले; आजचे नवे दर पाहा

SCROLL FOR NEXT