मुंबई

साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. प्रशांत पाटील

CD

विरार, ता. १४ (बातमीदार) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोकण प्रदेशांतर्गत पालघर तालुका शाखा आयोजित सातव्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, लेखक लायन डॉ. प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या वेळी सांगली येथील प्रसिद्ध कवी अशोक पवार व सुधीर दांडेकर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे उद्‍घाटन भूपेंद्र संखे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हाध्यक्षा प्रा. शुभम पाटील या भूषवणार आहेत.
१९ मार्च २०२३ रोजी स्व. किशोर संखे हॉल बोईसर, जिल्हा पालघर येथे दुपारी २ वाजता हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ग्रंथपूजनाने साहित्य संमेलनाची सुरुवात होणार असून उद्‍घाटन समारंभ, प्रास्ताविक, मान्यवरांचे मनोगत, काव्यसंमेलन असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. या साहित्य संमेलनास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, उपाध्यक्षा शुभांगी काळभोर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.

---------------------

कविता पाठवण्याचे आवाहन
साहित्य संमेलनाच्या काव्यसंमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवी, कवयित्री, विद्यार्थी आणि नवोदित साहित्यिक यांनी आपली कविता ९९७५५६२८०३ अथवा ९४०५०८१५६७ या क्रमांकावर १८ मार्च २०२३ पर्यंत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या आयोजनासाठी कोकण प्रदेश अध्यक्ष डॉ. अ. ना. रसनकुटे यांच्या अध्यक्षतेखाली विचारविनिमय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत डॉ. अलका नाईक, शंकरसुत संदीप तोडकर, प्रा. शुभम पाटील, डॉ. कमलाकर संखे, ऊर्मिला घरत, भूपेंद्र संखे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT